रात्री 10 नंतर चौकात चौकात ग्रुपने विना कारण थाबंलास कायदेशीर कारवाई केली जाईल पोलिस उपनिरीक्षक महामुनी यांचा इशारा




इचलकरंजी ्आनंद शिंदे


इचलकरंजी : हनुमान नगर मधील श्री गजानन गणेश उत्सव मंडळ ने गणेश जयंती उत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था मार्गदर्शक म्हणून  पोलिस उपनिरीक्षक महामुनी  यांनी गणेश उत्सव जयंती निमित्त कायदा कसा असतो गुन्हा कितीही असला तरी शिक्षा पात्र असतो म्हणून पालकांनी आपल्या मुलांना कॉलेजला व्यवस्थीत जातो काय त्यांचे मित्र संगत कशी आहे रात्री उशिरापर्यंत  घरी येतो इतका वेळ कोठे होतास  ? यांची  कल्पना आपणास असणे फार  गरजेचे आहे .चौकात चौकात मध्ये कोण कोण मुले असतात या वर पालकांनी या गोष्टी वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नाहीतर गुन्हेगारी वाढते.  महामुनी पुढे म्हणाले की तीन चार महिन्यात दोन खून झालते सुराईत गुंड जेल मधून  जामिनावर बाहेर पडले आहेत ,कोठेही जर दहशत करीत असेल तर आमच्या पोलिस अधिकार ना एक  मेसेज पाठवा आम्ही जातीने लक्ष घालून त्यांच्यावर कडक कारवाई करू तसेच  आपले नाव गुपीत ठेवले जाईल. त्या मुळे होणारी घटना घडण्यास आळा बसेल गाड्यांमधील पेट्रोल चोरणे, बॅटरी  चोरणे, महिलांच्या गळ्यातील गंठण मंगळसूत्र हिसकावून घेणे असे अनेक प्रकार आता कमी होऊ लागले आहेत कारण आम्ही गुन्हागारांवर कडक कारवाई करण्याचे काम  चालू केलेआहे. आम्हाला मोबाईल वर एक  मेसेज आल्या नंतर  आम्हीतात्काळ हजर होऊ .  काहीच दिवसांपूर्वी आठ ठिकाणी छापे टाकून  तलवारी जप्त करून कारवाई करण्यात आली. ओपन बार मध्ये  बराच वेळ पित बसणाऱ्यावर कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे.  महिला पुरुष व युवकांनी पुढे येऊन आम्हाला सहकार्य केले पाहिजे अशा ठिकाणी बारीक सारीक गुन्हे घडत आहेत त्या गुन्हेगारावर कडक कारवाई करू .मला ज्यावेळी तुमच्या हनुमान नगर भागातील नगरसेवक राजू बोंद्रे मला गणेश जयंती उत्सव आरती साठी निमंत्रण दिले  त्या वेळी मी बोंद्रे यांना विनंती केली की मला आपल्या भागातील महिला पुरुष यांचेशी संवाद साधण्याचा आहे किरकोळ घटना , अत्याचार, मारामारी जातीय दंगल अशी अनेक ठिकाणी घटना घडत असतात यावर कायदा सुव्यवस्था कशी असते त्याचे  प्रबाधेन झाले पाहिजे आणि महिलानी अन्याय विरोधात लढा दिला पाहिजे .मला या ठिकाणी बोलावून माझ्या हस्ते गणेश मूर्तीचे आरती पुजा केलीत त्याबद्दल मी  श्री गजानन उत्सव मंडळ चे मनःपूर्वक आभार मानतो . या कार्यक्रमास महिला पुरुष आणि युवा चा बरोबर सुसंवाद आणि मार्गदर्शक म्हणून नगरसेवक राजू बोंद्रे प्रसे मिडिया चे प्रत्रकार श्री आनंद शिंदे उपस्थित होते. तुषार कॅटर्स चे मालक श्री पांडुरंग लाळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. गणेश जयंती उत्सव व महाप्रसाद यशस्वी करण्यासाठी संत गाडगे महाराज चारिटेबल संस्था ट्रस्ट चे जा.सचिव श्री दिलीप शिंदे ,रमेश बिराजदार, आकाश शिंदे, सूरज भदरगे ,रोहित शिंदे ,प्रशांत सांवगार ,दिपक म्हेतर ,बाळू भिसे ,तुषार लाळे, राहूल घोरपडे ,समेघ चोगुले ,प्रशांत सांवगार, किरण भदरगे, यांनी  विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमास या  भागातील हजारो महिला पुरुषाने महाप्रसादाचा लाभ घेतला

Post a Comment

Previous Post Next Post