शिक्षक भारती उर्दू राज्य उपाध्यक्षपदी नवीद नाजीम पटेल सरओंकार पाखरे ( शिरोळ तालुका  प्रतिनिधी) 

शिक्षक भारती उर्दूच्या राज्य उपाध्यक्ष पदी उर्दू विद्या मंदिर घोसरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे कार्यरत असलेले कर्तबगार ,मेहनती,विध्यार्थी , शाळा व शिक्षण प्रेमी,शिक्षण व शिक्षकांच्या हक्कासाठी नेहमी अग्रेसर असणारे, शिक्षण व  समाजासाठी काही पण, अशा विचारांकचे एक आदर्श व हरहुन्नरी,  मुख्याध्यापक श्री. नविद नाजीम पटेल सर  यांची  आज मुंबईइथे निवड करून आमदार कपिल पाटील साहेब  साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले  . यावेळी राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे सर जालिंदर सरोदे सर , चंगेजखान पठाण साहेब, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नियाज पटेल व यासीन अन्सारी सर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments