शहर खड्डेमुक्त करा, नंतर आलिशान गाडी घ्या, माकपचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर .पिंपरी चिंचवड
 : पिंपरी चिंचवड मनपाच्या स्थायी समितीने महापौरसाठी जपानच्या टोयोटो कंपनीची 20 लाखाची मोटार खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यावरुन मार्क्सवादी कम्ययुनिस्ट पक्षाचे क्रांतिकुमार कडुलकर यांनी टिका केली आहे.चार वर्षांपूर्वी (2017)  महापौरासाठी खरेदी केलेली कार भंगारात काढली का? महसूल कमी झाल्यामुळे  मनपाकडे पैसे नाहीत. सर्व शहरात खड्ड्याचे साम्राज्य आहे. शहर खड्डेमुक्त करा, नंतर आलिशान गाडी घ्या, अशी टिका माकपचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर यांनी केली आहे.आलिशान गाडी खरेदी करण्याचा प्रस्ताव रद्द करावा, व सत्ताधारी भाजपने सर्व प्रकारची गैरवाजवी खरेदी थांबवून अनावश्यक खर्च टाळावा, अशीही मागणी कडूलकर यांनी केली आहे.

Post a comment

0 Comments