इचलकरंजी ते दोन्ही परिसरात केले प्रतिबंधित क्षेत्र



 इचलकरंजी येथील नाट्यगृह परिसरात कोरोनाचे तीन व बीजेपी मार्केट परिसरात एक रुग्ण आढळून आल्याने हे दोन्ही परिसर कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) करण्यात आले आहेत. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करुन आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.दरम्यान, कर्नाटक राज्यातून शहरात दाखल होनाऱ्या सर्वच एसटीची नदीवेस नाका येथे तपासणी केली जात होती.गतवर्षी जून महिन्यापासून इचलकरंजी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र बनले होते. परंतु इचलकरंजी नगरपरिषद व प्रशासनाच्यावतीने केलेल्या विविध उपाययोजना आणि नागरिकांच्या सहकार्याने इचलकरंजी महिन्याभरापूर्वी म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये कोरोनामुक्त झाली होती. मात्र गत काही दिवसांपासून शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून सध्या शहरात 5 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामध्ये श्रीमंत ना. बा.घोरपडे नाट्यगृह परिसरात एकाच घरातील तिघांचा तरबीजेपी मार्केटमध्ये एकाचा समावेश आहे. नाट्यगृह परिसरातील एकाला कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्याच घरात रविवारी लग्नसोहळा पार पडला. त्याच घरातील नवरी मुलगी तसेच तिची आत्या या दोघींचाअहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे.इचलकरंजी  नगरपरिषद प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णआलेला परिसर कंटेनमेंट झोन केला असून पत्रे मारुन भागातील रस्ते बंद केले आहेत.

  दरम्यान, कोरोनाचा(Covide-19) प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासन निर्देशांचे पालन केले जात असून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरण्यावर सोशल डिस्टरनसिंग न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून सोमवारी दिवसभरात 13 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यातआला.

Post a Comment

Previous Post Next Post