हुपरी नगरपरिषदेची कर वसुली सक्तीची , उपोषणाची तलवार कृती समितीची...!





हुपरी नगरपरिषदेने नगरपरिषदेची स्थापना झाल्यापासून नगरपरिषद हद्दीतील मिळकती मालमत्ता यांच्या करवसुली संदर्भात आजतागायत कोणताही ठराव केला नाही किंवा महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या मूल्यवर्धित कराची अमलबजावणी ही केली नाही.  त्यामुळे  नगरपरिषदेकडून   करवसुली केली जात असताना लोकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. बेकायदेशीरपणे अवाजवी कर वसुली होत आहे. लोकांनी विविध आवश्यक दाखल्यांची मागणी केली असता कर भरणे सक्तीचे केले जात आहे, या नगरपरिषदेच्या अशा कृत्याविरुद्ध हुपरी बचाव कृती समिती उतरली आहे. कर आकारणी नियमानुसार करावी.,  सक्तीची कर वसुली त्वरित थांबवावी या मागणीसाठी दि 23 फेब्रुवारी पासून हुपरी येथील हुतात्मा चौकात उपोषण करनार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले आहे.  या निवेदनावर अशोक खाडे, प्रतापराव जाधव, गणेश कोळी यांचेसह समितीतील पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post