पुणे, खडकी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डासह देशभरातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डांचा कार्यकाळ बुधवारी संपुष्टात आला.पुणे  :  पुणे, खडकी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डासह देशभरातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डांचा कार्यकाळ बुधवारी (दि.10) संपुष्टात आला. मात्र, आगामी काळात बोर्डाच्या निवडणुका केंव्हा होणार याबाबत अद्यापही कोणत्याही सूचना संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या नाहीत.

देशभरातील 56 बोर्डांचा कार्यकाल दहा फेब्रुवारीला संपुष्टात येत असल्याचे पत्र यापूर्वीच केंद्रीय संरक्षण मालमत्ता विभागाने सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांना पाठविले आहे. दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत या बोर्डांचा कारभार बोर्डाचे अध्यक्ष (लष्करी अधिकारी), मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंत्रालयाने नामनिर्देशित केलेला जनतेचा एक प्रतिनिधी असे तीन सदस्यीय मंडळामार्फत चालविण्यात येणार आहे.या 56 कॅन्टोन्मेंट बोर्डांचा कार्यकाळ वर्षभरापूर्वीच संपुष्टात आला आहे. त्यानंतर आतापर्यंत सहा-सहा महिन्यांची दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत 10 फेब्रुवारीला संपुष्टात आली. मात्र, तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची तरतूद कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक कायद्यात नाही.

कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत बोर्ड (संपूष्टात) व्हॅरी राहणार असून, अध्यक्ष, सीईओ आणि जनतेचा एक प्रतिनिधी बोर्डाचे कामकाज पाहणार आहे. जनतेचा प्रतिनिधी निवडण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून सूचना आल्यानंतर प्रस्ताव पाठविण्यात येतील, असे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनातर्फे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Post a comment

0 Comments