हुपरीची बदनामी करणाऱ्यांनी स्वाभिमान असेल तर शाळेच्या गेटच्या आत पाऊल ठेऊ नये. वसंतराव पाटील, संपादक


हुपरी : हुपरीची बदनामी करणाऱ्यांनी स्वाभिमान असेल तर शाळेच्या गेटच्या आत पाऊल ठेवू नये असा खणखणीत इशारा  हुपरी समाचार चे संपादक वसंतराव पाटील यांनी दिला आहे.  ते पूढे म्हणाले की मनमानी कारभार करता...लोकांना मरणयातना देता...लोकप्रतिनिधींना सन्मान देत नाही...आणि हुपरी नको म्हणून बदली मागणीचे रडगाणे गाता...हुपरीची बदनामी करता..मग हुपरीत येताच कशाला..? जर तुमच्यात खराखुरा स्वाभिमान जीवंत असेल तर आमच्या शाळेच्या गेटच्या आत पाऊल ठेऊ नका असा खणखणीत इशारा हुपरी समाचारचे संपादक वसंतराव पाटील यांनी दिला आहे.

हुपरी नगरपरिषदेत एका नागरीकास उतारा न दिलेने नैराश्येने व्यथित होऊन त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यावर हुपरी पालिकेतील अधिकारी मंडळींनी हुपरीत काम नको म्हणून वरिष्ठांकडे रडगाणे मांडले होते यावर ते बोलत होते.या वेळी संपादक वसंतराव पाटील यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.ते पुढे म्हणाले की, गाव कसं चालवायचं ते आम्ही बघून घेऊ. यापुढे हुपरीची बदनामी सहन केली जाणार नाही.

Post a comment

0 Comments