जागेचा ताबा सोडण्यासाठी तब्बल 10 लाखांची खंडणीची मागणी करणाऱ्यांनावर गुन्हा दाखल .पुणे  :  जागेचा ताबा सोडण्यासाठी तब्बल 10 लाखांची खंडणी  मागनाऱ्य रणवीर ईश्वरसिंग दुधाणी, अवतारसिंग दुधाणी, मिंन्टुसिंग दुधाणी, सिंकदरसिंग टाक, असुसिंग टाक, रणवीरसिंगची पत्नी याच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिंतामणीनगर येथे राहणाऱ्या  एकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान मौजे उरूळी देवाची येथील जमीनीच्या वादातून प्रकार घडला.

फिर्यादी आणि त्यांचा भाऊ यांच्या मालकीची उरूळी देवाची येथे 10 एकर जमीन आहे. जमीनीवर आरोपींनी फिर्यादींना येण्यास मज्जाव केला. त्या जाग्यावर पत्र्याचे शेड मारून फिर्यादीना जागेवर यायचे नाही अशी धमकी दिली.त्यानंतर जागेवर का आला, लवकर मरायचे आहे का ? अशी धमकी देऊन त्यांना शिवीगाळ केली होती. जागा पुन्हा हवी असल्यास प्रत्येकी 10 लाख रूपयांच्या खंडणीची मागितली. खंडणी न दिल्यास जमीवर पाय ठेवायचा नाही, अन्यथा पाय तोडून टाकील अशी धमकी दिली होती.तसेच पैसे दिलेतर जागा मिळेल नाहीतर तुमची जागा विसरून जायची अशी धमकी दिली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एस. ढावरे करत आहेत.

Post a comment

0 Comments