सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये गुरूवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली

ब्रेकिंग : 



पुणे:  कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसर जवळील सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये गुरूवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या दहा गाड्या व ब्रांटो ही अद्ययावत यंत्रणा असलेली गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सीरम इन्स्टिट्युटमधील "आर-बीसीजी' लस निर्मिती करणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली असून कोरोनाच्या "कोवीशील्ड' लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर आहे.

कोरोनावरील "कोविशील्ड' या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्युटमध्ये होत आहे. काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती.तर काही दिवसांपुर्वीच सीरम इन्स्टिट्युटमधून महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात कोवीशील्ड ही लस पाठविण्यात आली. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपुर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते.

- सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण​ सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस निर्मिती केंद्र तसेच अन्य विविध प्रकारच्या लशींचे उत्पादन केले जाते. दरम्यान, गुरूवारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मांजरी येथील प्लांटमध्ये आग लागल्याची घटना घडली.

सीरम इन्स्टिट्युटमधील "आर-बीसीजी' लस निर्मिती करणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली असून कोरोनाच्या "कोवीशील्ड' लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर आहे. दरम्यान, घटनेची खबर मध्यवर्ती अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर सुरूवातीला चार गाड्या आणि त्यानंतर आणखी सहा गाड्या घटनास्थळी तातडीने पाठविण्यात आल्या. याबरोबरच आग विझविण्याची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ब्रांटो या गाडीलाही तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले.

अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रासह हडपसर, कोंढवा व अन्य केंद्राच्या गाड्या व जवान आग विझविण्याच्या प्रयत्नात आहेत. याबरोबरच आगीच्या ठिकाणी पोलिसही तत्काळ दाखल झाले असून तेथे जमा झालेल्या गर्दीला हटविण्याचे तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे काम हडपसर पोलिसांकडून केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post