*शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*मुंबई दि.23 - शिवसेनेचे एकमेवाद्वितीय संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे प्रणेते होते.या  महायुती मुळे राज्यात दोन समजतील दरी कमी होऊन सामाजिक ऐक्य साधण्याचे क्रांतिकारक पाऊल पडले होते अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.मुंबईत फोर्ट येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णआकृती पुतळ्याच्या उदघाटना नंतर प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ना रामदास आठवले यांनी शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीच्या चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला.

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळा उदघाटन सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सर्व पक्षीय नेत्यांसमवेत ना रामदास आठवले हेही अजय कार्यक्रमास उपस्थित होते.               

Post a comment

0 Comments