इचलकरंजी स्टेशन रोड समोर वाहन चालवणे तारेवरची कसरत

 इचलकरंजी स्टेशन रोड संजय फौंड्री समोर रस्त्यांवरून वाहण चालवणे म्हणजे अपघातास आमंत्रण देणे़. 

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनू फरास :


इचलकरंजी :  स्टेशन रोड संजय फौंड्री ते मणेरे हायस्कुल रोड मुजावर स्क्रैप रस्त्यांचा उत्तरेला गटारी साठी उकरुन ठेवले असून काम सध्या कामकाज बंद पूर्णपणे  बंद करुन ठेवले आहे, शिवाय उकरलेली माती,दगड त्याच ठिकाणी पडून आहे .रस्त्यांचा भाग कोणत्या खड्यात  आहे ,की रस्ता खड्ड्यातून शोधावा लागतो़  ही कसरत किती दिवस करावी लागणार ? गेली चार ते पाच महीने काम बंद आहे . जनतेस किती दिवस वेटीस धरणार ? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटू लागल्या आहेत. ज्या ठेकेदारास सदर चे काम दिले आहे त्या ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. 
    Post a comment

0 Comments