इचलकरंजी : समाजवादी प्रबोदिनीची 43 वी वार्षिक सभा संपन्न

समाजवादी प्रबोधिनीची त्रेचाळीसावी वार्षिक सभा संपन्न

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी ता.६, लोकप्रबोधन करणारी संस्था ही समाजात सर्वांगीण समता प्रस्थापित व्हावी यासाठी सतत संघर्ष करत असते. सामाजिक शांततेसाठी वैचारिक संघर्ष करण्याचे काम समाजवादी प्रबोधिनी गेली त्रेचाळीस वर्षे सातत्याने करत आहे.आणि हे काम लेखणी,वाणी, गेली बत्तीस वर्षे सुरू असलेले प्रबोधन प्रकाशन ज्योती हे मासिक आणि अठ्ठावीस हजार पुस्तके व शंभरावर नियतकालिकांनी समृद्ध प्रबोधन वाचनालय तसेच व्याख्याने,व्याख्यानमाला ,चर्चासत्रे, शिबिरे,परिसंवाद,मेळावे यासारख्या सातत्यपूर्ण विविध उपक्रमांनी समाजवादी प्रबोधिनी यापुढेही अधिक व्यापकतेने करत राहील असा विश्वास प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांनी व्यक्त केला.ते समाजवादी प्रबोधिनीच्या त्रेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

प्रारंभी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी प्रबोधिनीच्या वाटचालीचा व उपक्रमांचा तपशीलवार आढावा घेतला.तसेच भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. यावेळी  विषयपत्रिके वरील सर्व विषयावर  सविस्तर चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.या चर्चेत प्राचार्य विश्वास सायनाकर,प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील,प्राचार्य डॉ.सुनील हेळकर ,प्रा.शिवाजी होडगे,बी.एस.खामकर,ऍड.अजित सूर्यवंशी,सुनील इनामदार, ऍड.दशरथ दळवी,एम.एस.चौगुले,समीर कुलकर्णी,प्रा.रमेश लवटे,प्रवीण पाटील यांनी सहभाग घेतला.आणि प्रबोधिनीचे काम व्यापक करण्याचे ठरविले.आज भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांची जपणूक करण्याची गरज आहे.तसेच भारतीय संस्कृती ते गांधीवाद ,मार्क्सवाद ते लोकशाही समाजवाद, बुद्धिझम ते राष्ट्रवाद ,आंबेडकरवाद ते समतावाद अशा सर्व  तत्वज्ञानाची नव्या पिढीला ओळख करून देणे गरजेचे आहे ते काम समाजवादी प्रबोधिनी अधिक जोमाने करेल असा आशावाद सर्व मंडळींनी व्यक्त केला.

यावेळी शशांक बावचकर,राहुल खंजिरे,के.एस.दानवाडे,प्रा.अनिल उंदरे,प्रा.आप्पासाहेब कमलाकर, रत्नाकर गोंधळी,अन्वर पटेल,प्रा.काशीनाथ तनंगे,दयानंद लिपारे,सचीन पाटोळे,पांडुरंग पिसे, सौदामिनी कुलकर्णी, प्रमोद खरात,संजय संकपाळ,विजय खातेदार,रणजित यादव, दशरथ घाडगे, शिवाजी दादा  पाटील,नंदा हालभावी, अश्विनी कोळी,शकील मुल्ला यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : समाजवादी प्रबोधिनीच्या वार्षिक सभेत बोलताना प्रा.डॉ.जे.एफ.पाटील मंचावर प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य विश्वास सायनाकर आणि प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील

Post a Comment

Previous Post Next Post