हुपरी समाचारचे संपादक वसंतराव पाटील यां चा सत्कार

 हुपरी समाचारचे संपादक वसंतराव पाटील यांचा सत्कार.


PRESS MEDIA LIVE : हुपरी : 

६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिन तसेच क्रांतीज्योत अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे कॉलेज हुपरी यांचे वतीने हुपरी समाचारचे संपादक वसंतराव पाटील यांचा सत्कार करणेत आला.

हुपरी समाचार वृत्तपत्राच्या माध्यमातून संपादक वसंतराव पाटील यांनी निर्भीडपणे अन्यायाविरुध्द आवाज उठवला.सामाजिक, प्रबोधनपर लेखनातून समाजजागृती केली. या कार्याचा गौरव करणेत आला.यावेळी शेंडूरे कॉलेजच्या प्राचार्या सौ.पाटील, प्रा.भोसले, प्रा.दिपक तोडकर, पत्रकार भाऊ खाडे, संजय पाटील, प्रविण कुंभोजकर, बाळासाहेब चोपडे शिक्षक वृंद व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a comment

0 Comments