विवेकानंद करोडो सर्वसामान्य माणसांना च देशाचा प्राण मानत. प्रसाद कुलकर्णी.

 विवेकानंद करोडो सर्वसामान्य माणसांनाच देशाचा प्राण मानत....,प्रसाद कुलकर्णी


PRESS MEDIA LIVE :

यड्राव ता.१२ मानवी संस्कृतीच्या उत्कर्षामध्ये श्रमाचे महत्व सर्वात मोठे आहे. विकास हेच जीवन आणि संकोच म्हणजे मृत्यू हे सार्वकालिक सत्य आहे. प्रत्येक कामात माणुसकी  प्रगट व्हायला हवी.कारण सर्वसामान्यांची उपेक्षा हे राष्ट्रीय महापाप ठरू शकते. मूठभर श्रीमंत हे बाह्यअलंकार असतील तर करोडो सर्वसामान्य हे देशाचे प्राण आहेत. हे सतत लक्षात ठेवून कार्यरत राहणे हीच युवा वर्गाची जबाबदारी आहे, अशी शिकवण स्वामी विवेकानंद यांनी दिली. असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ( एसआयटी )च्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त " स्वामी विवेकानंद यांची शिकवण " या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.ए.खोत होते.स्वागत व प्रास्ताविक प्रा.व्ही.एस.वाडकर यांनी केले.कार्यकारी संचालक अनिल बागणे प्रमुख उपस्थित होते.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक.सत्य हाच नववेदांताचा परमेश्वर आह.ऐहिककडे दुर्लक्ष नको.ऐहिक जीवनात सेवाभाव जपा,आसक्ती विरहित जगा तोच खरा मोक्ष आहे असे स्वामी विवेकानंदांचे मत होते. दरिद्री नारायणाची सेवा हाच खरा धर्म आहे.दुसऱ्या माणसासाठी अंतकरण द्रवत नाही तो देश व धर्म दुर्दैवी असे त्यांचे मत होते.जगाचे नुकसान आंधळ्या धर्मवेडा मुळे झाले आहे. पराकोटीचे प्रेम व द्वेष धर्मातूनच निर्माण होतो. म्हणून पर धर्मातील चांगल्याचा स्वीकार करून उन्नत होणे हे प्रत्येक धर्मनिष्ठ माणसाचे कर्तव्य आहे असे विवेकानंदांचे मत होते. स्वामी विवेकानंद यांच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व शिकवणुकीचे सार आपल्या मांडणीतून प्रसाद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post