अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर यांना ही वैधकिय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.

 अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना ही वैदयकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार .

आरोग्यराज्य मंत्री श्री राजेंद्र पाटील यद्रावकार




PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : 

 इचलकरंजी -:अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना ही 100 %अनुदानित शाळेप्रमाणे वैदयकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आरोग्य राज्य मंत्री श्री राजेंद्र पाटील (यद्रावकर) यांनी विनायक हायस्कूल शहापूर येथे हातकणंगले तालुका महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळास सांगितले.  महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे हातकणंगले तालुका अध्यक्ष श्री वि ह सपाटे यांनी प्रथमतः माननीय मंत्रीमहोदय यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन विना अनुदानित शाळेंच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन आरोग्य राज्य मंत्री श्री राजेंद्र पाटील( यद्रावकर) यांना दिले . मंत्री महोदय यांनी प्रचलीत नियमानुसार अनुदान टप्पा द्येय करणे, सेवा संरक्षण देने अघोषित शाळा नैसर्गिक वाढ तुकड्या यांना अनुदान देने या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही शिष्टमंडळास दिली.     यावेळी शहापूर शिक्षण मंडळाचे अध्यक्षा सुमनताई चव्हाण, उपाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण ,सचिव श्री अशोक चव्हाण ,श्री सुरेश चव्हाण तालुका अध्यक्ष श्री वि ह सपाटे , श्री श्याम कांबळे, श्री सागर पाटील, श्री विष्णू पाटील, सहदेव वसावे, सुरेखा कदम मॅडम, आशा देशींगेमॅडम, श्री श्रीकांत कदम , श्री अशोक सदावर्ते, श्री जयसिंग शिंदे, श्री अशोक राज आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post