रक्त दानाचे कार्य उल्लेखनीय.

 94 ग्रुपचे रक्तदानाचे कार्य उल्लेखनीय...

               *मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर*

L


  हुपरी येथील 94 ग्रुपच्या वतीने कै. आदिनाथ विजयकुमार पाटील यांच्या स्मरणार्थ गेली सलग ७ वर्षे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत होते. यावर्षी दि.३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या  रक्तदान शिबीराला  मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर साहेब यांनी भेट दिली. यावेळी कै. आदिनाथ पाटील यांना विनम्र अभिवादन केले व म्हणाले 94 ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आपल्या कै. पाटील या मित्राचा अपघात झाला असता त्याला उपचारादरम्यान रक्त न मिळाल्याने मृत्यू झाला होता. असा प्रसंग इतर कोणाच्या बाबतीत घडू नये यासाठी आपण गेली ७ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करता हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तुमच्या सारखे मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात यावेत असे मत व्यक्त केले. आपण हा स्तुत्य उपक्रम राबवून समाजामध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे. असेही ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमास हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट वहिनी व मा.उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे नगरसेविका साळोखे वहिनी इतर नगरसेविका तसेच संजय चौगुले adv संग्रामसिंह निंबाळकर अमित गाट सचिन गाट अमोल गाट सर, उमेश पाटील,  अमोल माळी,  डॉ. अभिजीत भोजकर, रितेश ओसवाल, रघुनाथ नलवडे,सतीश भोजे संभाजी हांडे, सुहास सपाटे,राजू साळोखे,संतोष नरंदेकर राजकुमार पुराद मनोज पाटील संजय लोहार व इतर उपस्थित मान्यवर.

Post a comment

0 Comments