बेकायदा गुटखा विक्रीतून


पुण्यात बेकायदा गुटखा विक्रीतून मिळालेल्या मोठ्या रकमेची देवाण घेवाण हवाला व्यवहाराचा करण्याचा प्रकार गुन्हे शाखे कडून उघडकीस.



 

PRESS MEDIA LIVE : पुणे : प्रतिनिधी :

पुण्यात बेकायदा गुटखा विक्रीतून मिळालेली मोठ्या रक्कमेची देवाण-घेवाण हवाला व्यवहाराच्या माध्यमातून करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. फरासखाना आणि विश्रामबाग परिसरात रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत दीड ते दोन कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईत आठ ते नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते.

राज्यात तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुटखा विक्रीवर बंदी आहे. परराज्यातून आलेल्या गुटख्याची विक्री शहरात करण्यात येते होती. गुटखा विक्रीतून मिळालेली रोकड हवाला व्यवहाराच्या माध्यमातून पोहचविण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली होती.त्यानुसार बुधवारी रात्री पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौगुले यांच्या पथकाने दोन इमारतीत कारवाई केली. या इमारतीत असलेल्या कार्यालयातून हवाला व्यवहाराच्या माध्यमातून गुटखा विक्रीतील रोकड संबंधितांना पोहचविण्यात येत असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी हवाला व्यवहार करणाऱ्या चार कार्यालयांवर कारवाई केली असून नोव्हेंबरमध्ये लोणीकाळभोर परिसरात बेकायदा गुटखा विक्री प्रकरणात एकाला पकडण्यात आले होते. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत बेकायदा गुटखा विक्रीतून मिळालेली रोकड हवाला व्यवहारातून संबंधितांपर्यंत पोहचविण्यात येत असल्याची माहिती मिळाली दिली होती.



Post a Comment

Previous Post Next Post