पुणे महानगरपालिका :


 पुणे महानगरपालिकेवर नोटीस मागे घेण्याची नामुष्की  ओढावली.


 

PRESS MEDIA LIVE :  पुणे : प्रतिनिधी :

पुणे :  - पुणे महापालिकेच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे आहे. पालिकेच्या या कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसतो. असाच एक प्रकार समोर आला आहे. केवळ रंगाचा वास येतो म्हणून पुणे महापालिकेने एका चित्रकाराला कारणे दाखवा नोटीस बजावली. शहरातील महत्त्वाच्या आणि गंभीर समस्या सोडवण्याचे काम सोडून एका चित्रकाराला नोटीस बजवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये अनामिक कूचन आणि कृष्णा कूचन हे कलाकार राहतात. या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून या दाम्पत्याला महापालिकेने नोटीस बजावली. जेव्हा नोटिशीविरोधात या दांपत्याने आपली बाजू मांडली तेव्हा सर्व प्रकार लक्षात येताच पालिकेला आपली त्यांनी आपली नोटीस मागे घेतली आहे. मात्र, पालिकेच्या या कारभारामुळे या दाम्पत्याला विनाकारण मानसिक त्रास सोसावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, कूचन दाम्पत्य पुण्यातील कर्वेनगर भागात भाड्याच्या घरात राहते. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आणि त्यांनी स्टुडिओतच आपला संसार थाटला. मात्र समोर राहणाऱ्या एका कुटुंबाने रंगाचा वास येत असल्याची तक्रार पुणे महापालिकेकडे केली. महापालिकेच्या सतर्क अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ कूचन दाम्पत्याच्या घरी पाहणी करण्यासाठी कर्मचारी पाठवून नोटीस दिली.

एवढेच नाही तर या नोटीसमध्ये कूचन यांना फॅन बसवणे, व्यावसायिक काम घरात हलवण्याचा सल्ला दिला. अखेर या दांपत्याने आवाज उठवला तेव्हा मात्र महापालिकेवर नोटीस मागे घेण्याची नामुष्की ओढावली. मात्र, या सगळ्या प्रकारात कूचन यांचे दोन महिने वाया गेले. चित्रकारांनी कुठे चित्र काढायचे हे महापालिका ठरवणार का ? असा संतप्त सवाल कूचन दांपत्याने उपस्थित केला आहे. लक्षात आली.

Post a comment

0 Comments