सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2000 पेक्षाही जास्त बांधकाम कामगारांची जोरदार निदर्शने.

 


सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2000 पेक्षाहि जास्त बांधकाम कामगारांची जोरदार निदर्शने.

  (प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले. सांगली जिल्ह्यामध्ये  चाळीस हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगार असून त्यांचे सर्व काम मागील एक वर्षभर पासून पूर्णपणे थांबलेले आहे . सांगली जिल्ह्यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगारांच्या लाभाच्या अर्ज प्रलंबित असून त्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी व कामगारांना सत्वर लाभ द्यावेत या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विशेषता मागील एक वर्षांमध्ये या नोंदीत बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्या विधवा महिलांना नियमाप्रमाणे अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कम मिळाली नाही. तसेच मागील एक वर्षांमध्ये विधवा महिलांना महिन्याला दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते ते सुद्धा मिळाले नाही आणि त्याचबरोबर मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना दोन लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते ते अर्ज सुद्धा मंजूर केलेले नाहीत. त्याचबरोबर एक हजारापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी घरासाठी अनुदान मिळण्याबाबत अर्ज केलेले आहेत परंतु एकाही कामगारास अजून घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये निर्णयाप्रमाणे मिळाले नाहीत. मागील एक वर्षापासून बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी जे rs.5000 दिलेले आहेत ते थोड्या कामगारांनाच मिळालेले आहेत बहुसंख्य कामगार या लाभापासून वंचित आहेत त्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही लॉक डावून काळामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये देण्यात आलेले आहेत परंतु हे पाच हजार रुपये सुद्धा नोंदीत बांधकाम कामगारांच्या पैकी बहुसंख्य कामगारांना अजूनही मिळालेले नाहीत त्याचबरोबर मागील दोन वर्षापासून बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. बांधकाम कामगारांच्या पत्नींना प्रसुतीचे मदत व शस्त्रक्रिया मदत अजूनही मिळालेले नाही अशाप्रकारे सर्व कामकाज ऑनलाईन करण्याच्या नावाखाली ठप्प आहे ते काम ताबडतोब सुरू व्हावे यासाठी दोन हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी 29 डिसेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत जोरदार आंदोलन केले.


 शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदना संदर्भात बोलताना शंकर पुजारी यांनी सांगितले की  13 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत संघटनेस असे लिहून देण्यात आलेले आहेत की सर्व प्रलंबित अर्ज ३०  नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत तपासून मंजूर  करण्यात येतील व कामगारांना लाभ  देण्यात येतील. परंतु 29 डिसेंबर होऊनही आज सांगली जिल्ह्यामध्ये दहा हजारापेक्षा जास्त प्रलंबित अर्ज आहेत त्याचा निपटारा त्वरित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. कॉ शंकर पुजारी यांनी असेही सांगितले की सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू असून आचारसंहितेमुळे कसलेही  लाभ देता येणार नाही व अर्ज मंजूर करता येणार नाही असा फतवा सरकारी कामगार अधिकारी यांनी काढलेला आहे. परंतु आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच जे अर्ज मंजूर आहे ते काम सुद्धा थांबवण्यात आले आहे. अशा प्रकारे सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून बांधकाम कामगारांच्या वर अन्याय चालू आहे असे सांगितले. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी सांगितले की सांगलीच्या सहायक  कामगार आयुक्तांना तातडीने बोलावून घेण्यात येऊन याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.


 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सांगता सभेमध्ये बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की जिल्हाधिकारी सहायक  कामगार आयुक्तांना बोलून घेऊन या अर्जांचा निपटारा करण्याबाबत िर्णय करण्यात येईल. असे आश्‍वासन दिले आहे. तसेच या आंदोलनाची दखल घेऊन 30 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र कामगार आयुक्तांनी कामगार संघटनांच्या बरोबर मुंबई बांद्रा कामगार आयुक्त कार्यालयांमध्ये संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.


 यानंतर बोलताना कॉम्रेड विजय बचाटे यांनी सांगितले की,महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कल्याणकारी मंडळामार्फत ऑनलाईन बांधकाम कामगारांचे कामकाज करणे पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहे राज्यांमध्ये दहा लाखापेक्षा जास्त अर्ज  मागील वर्षभरापासून प्रलंबित असून 23 जुलैपासून हे काम ऑनलाईन करण्यात येईल असे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात मात्र एक हजार अर्जांची सुद्धा पूर्तता ऑनलाईन पद्धतीने झालेली नाही म्हणून या संदर्भातही ही मागणी मान्य न झाल्यास चार जानेवारीपासून मुंबई बांद्रा कामगार आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्रातील बांधकाम कामगार बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहे. आणि या आंदोलनामध्ये सुद्धा कामगार आणि मोठ्या संख्येने भागीदारी करावी असे आवाहन त्यांनी केले.या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड नंदकुमार हातेकर व किसान सभेच्या वतीने कॉम्रेड वैभव पवार यांनी पाठिंबा दिला .या आंदोलनास जयसिंगपूर येथील बांधकाम कामगारांचे नेते कॉम्रेड रघुनाथ देशिंगे व  सातारा जिल्ह्यातील कॉम्रेड धनराज कांबळे यांनीही पाठिंबा दिला या आंदोलनामध्ये महिला बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड होती आंदोलनामध्ये भारत सरकारने ताबडतोब तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द केले पाहिजेत देशातील 44 कामगार कायदे रद्द करून चार आचारसहिता लागू करण्याचे धोरण सरकारने रद्द केले पाहिजे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विजय असो महागाई वाढवणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो इत्यादी घोषणा देण्यात आल्या.


 हे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये कॉ सुमन पुजारी, वर्षा गडचे, बाळासो सुतार, प्रदीप जाधव ,निलोफर डांगे, तुकाराम जाधव, दादासो बुद्रुक, राम कदम, तानाजी जाधव, जोशना रास्ते. शंकर कुंभार, संजय दम्बे , निर्मला कांबळे, पूनम कांबळे, उत्तम पाटील. सो. कुंभार, विद्या कांबळे, सुनील गुळवणी, रोहिणी कांबळे ,संतोष बेलदार ,तानाजी जाधव, पुनम कांबळे, निर्मला कांबळे, रोहिणी कांबळे इत्यादींनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

Post a Comment

Previous Post Next Post