AdSense code जा गो ग्राहक जागो. ग्राहक दिनानिमित्त ग्राहक सप्ताह साजरा करण्यात आला.

जा गो ग्राहक जागो. ग्राहक दिनानिमित्त ग्राहक सप्ताह साजरा करण्यात आला.

 जागो  ग्राहक जागो.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : 

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा इचलकरंजी यांच्या वतीने २४ डिसेंबर ग्राहक दिनानिमित्य ग्राहक सप्ताह साजरा करण्यात आला सप्ताह औचित्य साधून इचलकरंजी ग्राहक पंचायतीच्या वतीने रविवारी दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी ऑफिसचे व बोर्डाचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे गावभाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र लोहार साहेब तसेच कोल्हापूर जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बी.जे. पाटील सर,उपाध्यक्ष जगदीश पाटील, संघटक सुरेश माने, सचिव दादासाहेब शेलार, सदस्य संजय पवार, महानगराअध्यक्ष अशोक पोतनीस, सदस्या सौ.आरती पोतनीस, महिला संघटिका प्रमोदिनी माने, व कायदेशीर सल्लागार अॅड. वायगंकर, तसेच इचलकरंजीचे  ग्राहक पंचायतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम डिजिटल बोर्डाचे अनावरण करून ऑफिस चे उद्घाटन गावभाग पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री गजेंद्र लोहार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत करून श्री स्वामी विवेकानंद व ग्राहक पंचायतीचे प्रमुख बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या नंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री सुरेंद्र दास सर यांनी केले यांनी इचलकरंजी शाखेच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला व ग्राहकांना येणाऱ्या अडचणी त्या कशा सोडवाव्या याबद्दल मार्गदर्शन केले व आपल्या प्रास्ताविका मध्ये आजपर्यंत कार्याचा आढावा सविस्तर सांगितले. तसेच इचलकरंजी शाखेचे कायदेशीर सल्लागार श्री सुकुमार नरंदेकर सर यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर कोविंड योध्दाचा सत्कार करण्यात आला गेली सात-आठ महिने पूर्ण जगावर,व देशावर महामारीने सर्व जीवन व्यस्त करून ठेवलेले होते अशा परिस्थितीत देवदूत म्हणून ज्यांनी ज्यांनी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य लोकांसाठी रात्रदिवस झटणाऱ्या काही ठराविक कोरोना युद्धांचा यथोचित सन्मान पत्र देऊन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये गावभाग पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री गजेंद्र लोहार साहेब यांचा सत्कार  इचलकरंजी पंचायतीचे अध्यक्ष श्री सुरेंद्र दास सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचा सत्कार अशोक ठोमके यांच्या हस्ते करण्यात आले. वाहतूक शाखा विभागाचे नियंत्रक श्री सुरेश ठाणेकर यांचा सत्कार लालचंद पारीक व सोहेल मुल्ला यांचा सत्कार सुकुमार नरंदेक सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच इचलकंरजी तील सेवाभावी हॉस्पिटल कमीतकमी खर्चामध्ये अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर हेडगेवार ट्रस्ट मार्फत चालवण्यात आलेले सेवा भारती हॉस्पिटलच्या डॉक्टरचे सत्कार सुरेश सारवाडे यांनी केले.तसेच इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संघ यांचे अध्यक्ष श्री अनिल घोडके यांचा सत्कार संजय शिरदवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वस्त धान्य दुकान बद्दल जेथे जेथे तक्रारी असतील त्या तक्रारी चे निवारण स्वखर्चाने करून सर्व गरिबांना स्वस्त धान्य दुकानातील धान्य मिळवून दिले या बद्दल श्री राजेंद्र महालिंगपूर  यांचा सत्कार अरुण साळुंखे यांनी केले.तसेच सत्कार मूर्तींच्या मनोगतामध्ये अनिल घोडके यांनी आपल्या जीवनमुक्ती सेवा संघाची माहिती सांगितले व सत्कार बद्दल आभार मानले. यानंतर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री बी.जे.पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व इचलकरंजीत च्या कार्याचा कमीतकमी कालावधी मध्ये जास्त व सुंदर कामकेले बद्दल कैतुक गौरव केला. व पुस्तक शाखेसाठी भेट दिले यानंतर जगदीश पाटील उपाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शेती मधील व शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी बोलून दाखवले यानंतर अशोक पोतनीस यांनी पोलिसांच्या कार्याचा गौरव केला व ग्राहक चळवळीचे महत्त्व सांगितले अॅड. वायगणकर कायदे सल्लागार यांनी ग्राहक पंचायतीच्या कायद्याचा उपयोग कसा करावा व कायद्यामध्ये कोणकोणते बदल झाले आहेत व ग्राहकांनी कसे जागृत राहावे ग्राहकांनी बीले कशी घ्यावेत इत्यादी गोष्टीचे मार्गदर्शन केले. तसेच महिला संघटिका सौ.प्रमोदिनी माने यांनी महिलांच्या वरील अत्याचाराबद्दल माहिती दिली व महिलांनी कसे सक्षम झाले पाहिजे हे पटवून दिले. सर्वात शेवटी अध्यक्ष मनोगतामध्ये गावभाग पोलीस स्टेशनचे निरीक्षक ग्राहकांना आपण कसे जागरूक करायला पाहिजे कोणती वस्तू खरेदी करत असताना त्याचे बिल घेणे आवश्यक आहे. या गोष्टीचे सविस्तर विवेचन केले मेडिकल क्षेत्रामध्ये होणारे शोशन औषधे व डॉक्टरांचे बिला यांच्यातील तफावत सर्वसामान्य गरीब जनतेचे हाल इत्यादी गोष्टीचे मार्गदर्शन केले. ग्राहका हा केंद्रबिंदू मानून निस्वार्थपणे काम करणे गरजेचे आहे व ही चळवळ कशी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचवावी याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. गोर गरीब लोकांचे हातावर पोट असल्यामुळे तो न्याय मागणार कोणाकडे आणि न्याय मागण्यासाठी त्याच्याकडे वेळ आहे का? व कुठे तक्रार दाखल करावी. केल्यानंतर त्याच्याकडे पैसे नसतात कोर्टापर्यंत कसे जावे याकरिता ग्राहक पंचायत पुढाकार घेऊन या सर्व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे. त्याकरिता लागेल ते सहकार्य आमच्या विभागाकडून आपणास मिळेल असे आव्हान केले.तसेच हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले त्या व्यक्तींचे इचलरकंजी ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये दत्त भेल चे मालक संतोष घुणके, व जवाहर सायझिंग चे मालक अस्लम मुजावर, शामकृपा इंडस्ट्रीजचे मालक, श्री अविनाश वासुदेव, व गोमटेश प्रिंटिंग प्रेस चे मालक संजय शिरदवाडे, या सर्वांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला व शेवटी आभार लक्ष्मण पाटील सर यांनी केले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी हरिहर मॅडम व श्री शिवकुमार मुरतले सर यांनी केले व शेवटी सौ.आरती पोतनीस यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमास इचलकरंजी तील  कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवर सदस्य उपस्थित होते

यामध्ये सुरेंद्र दास सर, अशोक ठोमके, अरुण साळुंखे, लालचंद पारीक, अविनाश वासुदेव, सुरेश सारवाडे, लक्ष्मण पाटील, संजय शिरदवाडे, संजीवनी हरिहर, विजय पाटील, तानाजी मोरे, सुरेश इंगळे,‌सारंग दास, अविनाश वासुदेव,आय.बी.एम. कॉमेरामन ,अस्लम मुजावर, गंगाराम पाटील, सौ. अर्चना लवटे, सुकुमार नरंदे कर अॅड. अक्षय शिरगुप्पे,सारंग दास,शिवकुमार मुरतले, सौ.विजया माळी प्रथमेश शिरदवाडे, करण बिल्ला, इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments