आज च्या दिवशी श्री. राज ठाकरे यांनी....

 आजच्याच दिवशी श्री.राज ठाकरे यांनी १८ डिसेंबर २००५ ला शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला.

पक्षांतर्गत घडामोडी, मानसिक त्रास आणि काही बहुत अडचणींना सामोरं जाऊन राज यांनी एक नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची हिंमत केली. ही हिंमत जितकी वाटावी तितकी सोपी नव्हती. श्री.बाळासाहेब ठाकरे,श्री.शरद पवार या अव्वल राजकारण्यांसमोर नवा पक्ष स्थापन करायचा म्हणजे कोण्या येरा गबाळ्याचे काम नव्हे ते!! 


 

इथे काही लोकं राज ठाकरेंना राजकारणाचे धडे द्यायलाही मागे पुढे न पाहणारे. जेव्हा या महाभागांचे महाविद्यालयीन शिक्षण चालु होते तेव्हा राज यांनी महाराष्ट्र पादाक्रांत केला होता. शिवसेनेसाठी पक्षसंघटन कार्य देणार्या राज यांनी शिवसेनेच्या सर्वच गोष्टींतुन काढता पाय घेतला.

राहिला प्रश्न पुर्ण वेळ राजकारणाचा.

कसं आहे जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या अस्मितेचा-मराठी माणसाचा विषय येतो तेव्हा #राज #ठाकरे हे पहिलं नाव नेहमीच भेदलं जातं. 

राज यांचे पक्षसहकारी यात कमी पडत जरी असले तरी राज यांचा आलेख चढता आहे. जी लोकं प्रामाणिकपणाला, स्वाभिमानाला जास्त महत्त्व देतात त्यांना राज हे नेहमीच प्रिय असतील. खरंय जोपर्यंत राज आहेत तोपर्यंत मराठी माणुस- मराठी अस्मिता- महाराष्ट्र याला तडा जाऊ देणार नाहीत याची खात्री काहींचे मुख्यमंत्री असुनही त्यांचे पक्षसहकारी खुश नाही. 

असो चालायचंच. पण आज बरं वाटतं की राज यांनी त्यावेळी योग्यच केलं. आजची शिवसेनेची दशा आणि विरुद्ध दिशा बघता मराठी माणसाला कोणीच वाली उरला नसता. पण राज यांनी दाखवलेल्या हिंमतीवर मराठी माणुस किमान जीवंत राहिलाय.  श्री. राज ठाकरे हेच महाराष्ट्राचे खरे बाहुबली!!


सस्नेह जय महाराष्ट्र !!

श्री.यज्ञेश श्री.पास्टे.

Post a comment

0 Comments