सुमंत स्मृती पुरस्कार जाहीर.


दाते संस्थेचे भोळे - सुमंत स्मृती पुरस्कार जाहीर.

 डॉ. राजा दीक्षित, सुरेश सावंत, डॉ. चिन्मय धारुरकर मानकरी

डॉ. सु.श्री. पांढरीपांडे यांना जीवनगौरव  पुरस्कार.PRESS MEDIA LIVE : 

वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. राजा दीक्षित (पुणे ) , सुरेश सावंत ( मुंबई ) व डॉ . चिन्मय धारुरकर( केरळ ) यांची निवड करण्यात आली आहे .   डॉ. यशवंत सुमंत कुटुंबियांच्या वतीने गेल्या वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकासाठी जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे. या दुसऱ्या पुरस्कारासाठी वैचारिक  क्षेत्रात मौलिक योगदान देणारे नागपूरचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत  डॉ. सु. श्री. पांढरीपांडे यांची निवड करण्यात आली आहे,अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ व दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.

      यशवंतराव दाते स्मृती संस्था व डॉ. भा. ल . भोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्‍या भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी 'प्रार्थना समाजाचा इतिहास '  या ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ इतिहास संशोधक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निवृत्त इतिहास विभाग प्रमुख व सध्याचे सन्माननीय प्रा .डॉ. राजा दीक्षित यांची निवड करण्यात आली आहे. 

     भोळे कुटुंबीय व दाते संस्थेचे संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या डॉ .भा.ल .भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी पुरोगामी कार्यकर्ते सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.    डॉ . यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कारासाठी भाषा शास्त्रातील तरुण अभ्यासक केरळ येथील  डॉ .चिन्मय धारुरकर यांची निवड करण्यात आली आहे वरील  पुरस्काराचे स्वरूप  डॉ.भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी वीस हजार व डॉ.यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी  दहा हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे आहे.

     या पुरस्कारांचे वितरण यथावकाश  समारंभपूर्वक करण्यात येईल असे दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी सांगितले.  पुरस्कार निवड समितीमध्ये प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे ,प्रा. हाशम शेख (वर्धा ), डॉ . अशोक चौसाळकर ( कोल्हापूर ), हिरण्यमय भोळे ( पुणे ) व किशोर बेडकिहाळ ( सातारा ) आदी मान्यवरांनी काम केले अशी माहिती दाते स्मृती संस्थेचे  संजय इंगळे तिगावकर व डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली.माधुरी सुमंत , विजयाताई भोळे  व दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे योगदानाद्वारे गेले अनेक वर्षांपासून हा उपक्रम महाराष्ट्रातील वैचारिक, साहित्यिक, सामाजिक  व सांस्कृतिक क्षेत्रात राबविण्यात येत आहे .

Post a comment

0 Comments