कामगार संघटनेच्यावतीने दिनांक 8 डिसेंबर रोजी

 सांगली जिल्ह्यामध्ये आयटक कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 8 डिसेंबर भारत बंद साठी जाहीर पाठिंबा.


PRESS MEDIA LIVE : sangli :


शेतकऱ्यांच्या पाचशेपेक्षा जास्त संघटनांच्या किसान संघर्ष समन्वय समिती या देशव्यापी मंचाने भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे.शेतकरी विरोधी तीन काळे कायदे व कामगार विरोधी आणि मालक धार्जिणे चार लेबर कोड कायदे ताबडतोब रद्द करावेत व त्यांच्या संघटनेशी चर्चा केल्याशिवाय कायदा मध्ये कोणताही बदल करू नये.भारत बंद तयारीसाठी सांगली निवारा भवन येथे जिल्ह्यातील आयटक कामगार संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक झाली. याप्रसंगी बोलताना आयटकचे नेते कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले की,

भारत बंद - महाराष्ट्र बंद सर्व 

भारतीयासाठी - आम्ही सारे शेतकऱ्या समवेत आहोत. 7/12 मधे नाव टिकवायच असेल तर 8/12 च्या आंदोलनात सहभागी व्हा. 

शेतकऱ्यांचा अभूतपूर्व संघर्ष 130 केाटी भारतीय नागरिकांच्या अन्न सुरक्षे साठी महत्वाचा आहे . रिक्षा ,टॅक्सी ,खाजगी गाड्यां रस्त्यावर आणू नका . दुकाने बंद ठेवा .

    हा संप नाही. एक दिवस  8/12/2020 रेाजी अन्नदाता शेतकऱ्यासाठी स्वेच्छेने बंद पाळा. जनतेच्या एकजुटीतूनच भाजप प्रणित केन्द्र सरकार चे कुटील कारस्थान हाणून पाडतां येईल . डॅा बाबा साहेब आंबेंडकरांना हीच लेाकशाही अभिप्रेत आहे 

आठ डिसेंबर रोजी ठीक सकाळी अकरा वाजता सांगली पुष्पराज चौकामध्ये भारत बंद समर्थनार्थ निदर्शने करण्यात येणार आहेत त्या निदर्शनांमध्ये लोकांनी मोठ्या संख्येने भागीदारी करावी असे असे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

    या बैठकीमध्ये बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कॉ विजय बचाटे, सर्व श्रमिक संघाच्या वतीने कॉम्रेड गोपाल पाटील,आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने कॉ सुमन पुजारी, महिला फेडरेशनच्या वतीने कॉ वर्षा गडचे, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने कॉ जोतराव, ग्रामपंचायत कामगार संघटनेच्यावतीने एडवोकेट राहुल जाधव व लाल बावटाशेतमजूर संघटनेच्यावतीने कॉ सुनील गुळवनी यांनी सांगली जिल्ह्यामध्ये भारत बंद पूर्णपणे यशस्वी करावा असे जनतेस आवाहन केलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post