शेतकऱ्यांचे आज उपोषण.

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आज उपोषण.


PRESS MEDIA LIVE :

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र आज हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांचे हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी धरणे आंदोलनही केले जाणार आहे.

शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी यांनी याविषयी माहिती दिली. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उपोषण 14 डिसेंबरपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याच्याच योजनेचा हिस्सा असल्याचे त्यांनी चढूनी यांनी सिंघू बॉर्डरवर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सर्व शेतकरी नेत आपापल्या ठिकाणी उपोषण करणार आहेत.

'काही संघटना आंदोलन मागे घेत आहेत आणि सांगत आहेत की, ते सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या बाजूने आहेत. आम्ही स्पष्ट करतो की, ते आमच्यासोबत नाहीत. त्यांचे सरकारसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी आमचं आंदोलन कमकुवत करण्याचं षड्यंत्र रचलं आहे. सरकार शेतकऱ्यांचं हे आंदोलन संपवण्याचा कट रचत असल्याचाही आरोप यावेळी केला.'

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे की, ते शतकऱ्यांसोबत सोमवारी एक दिवसाचा उपवास ठेवणार आहेत. त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व समर्थकांना एक दिवसाचा उपवास करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबतच त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि म्हणाले की, 'काही केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेते म्हणत आहेत की, शेतकरी आंदोलन राष्ट्राच्या विरोधी आगे. अनेक माजी सैनिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, गायक, दिग्गज, डॉक्टर, व्यापारी शेतकऱ्यांचं समर्थन करत आहेत. भाजपला विचारायचं आहे की, मग हे सर्व लोक देशद्रोही आहेत का?आहेत.'

डिजिटल प्रेस मीडिया आता  टेलिग्रामवर.

Post a Comment

Previous Post Next Post