सातत्याने आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांचा व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव केला पाहिजे.
आमदार प्रकाश आवाडे.
इचलकरंजी : प्रतिनिधी : प्रेस मीडिया च्या एकविसा वा वर्धापनदिना निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, बाळासाहेब उदगट्टी , विशाल सरनाईक, सुनीता देसाई व अनु मान्यवर हजर होते.
अध्यक्ष भाषणात आमदार प्रकाश आवाडे म्हणाले की सातत्याने आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांचा व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव केला पाहिजे, तर नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पत्रकार चांगले काम करतात त्यांचा गौरव केलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या.
प्रेस मीडिया तर्फे राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार ईचलकरंजी येथील सकाळचे पत्रकार पंडित कोंडेकर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात, संघर्ष नायक चे संपादक आठवले यांना उत्कृष्ट आदर्श संपादक पुरस्कार देण्यात आला, साप्ताहिक ग्रामदैवत चे संपादक विजय फडतारे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला, फारुख मोहम्मद रफी मांगोरे यांना आदर्श युवा समाज पुरस्कार देण्यात आला, सौ लक्ष्मी कोळी यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देणे आला , नागेश शेजाळ यांना आदर्श समाज भूषण पुरस्कार देण्यात आला, मोर्चे कुमार स्मित स्वप्नील पारखे यांना यांना आदर्श रत्न पुरस्कार देण्यात आला. त्याच बरोबर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कुमारी नमिना इम्तियाज फरास ला गौरव पत्र देऊन गौरव करण्यात आला, संत गाडगे महाराज चारीटेबल ट्रस्ट संस्था यांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात अनेक जणांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरचा कार्यक्रम प्रेस मीडिया व शिंगाडे चारीटेबल ट्रस्ट तर्फे हा कार्येक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. विक्रम शिंगाडे व प्रीती हट्टी मनी याने केले. प्रास्ताविक मनु फरास यांनी केले.
शिरोळ येथील साप्ताहिक वार्ता सुखचे संपादक दत्तात्रय खडके यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला, सांगली जिल्ह्यातील पारीसा बापू भोकरे मुक्त पत्रकार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला. बेळगाव येथील सुनिता देसाई यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला, श्री केसरकर यांना आदर्श सहकार रत्न पुरस्कार देण्यात आला, बाळासाहेब उध घट्टी यांना आदर्श सहकार रत्न पुरस्कार देण्यात आला, उर्मिला हेगडे निपाणी यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार देण्यात आला, आजरा येथील चंद्रकांत आजरेकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला, सौ. उर्मिला हेगडे यांना आदर्श सहकार पुरस्कार देण्यात आला, सौ. भारती तुकाराम कोपर्डी यांना आदर्श शिक्षिका, पुरस्कार देण्यात आला, बांबवडे चे रामचंद्र लोहार पिशवीकर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला, दिलीप कुमार मांगडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात, श्रीरंग नारायण तांबे गिजने गाव यांना सहकार्य रत्न पुरस्कार देण्यात आला, लक्ष्मण सुकलाल गायकवाड कनेरी यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमानंतर आदर्श पत्रकार महासंघ महाराष्ट्र ची कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून गणेश पाखरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी दत्तवाड येथील मिलिंद देशपांडे यांची निवड करण्यात आली जिल्हा सचिव म्हणून शिवकुमार मुरतले यांची निवड करण्यात आली. या वेळी आदर्श पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष मेहबूब सर्जे खान, राज उपाध्यक्ष दत्तात्रय फडके, राज्य संघटक विक्रम शिंगाडे, राज्य कार्यकारणी सदस्य आठवले उपस्थित होते.
0 Comments