इचलकरंजी शहर

 इचलकरंजी शहर नैसर्गिक गॅस वितरण प्रकल्प सोहळ्याचे उद्घाटन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचे उपस्थित करण्यात आले.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :


पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस नियामक (भारत सरकार) मंडळामार्फत कोल्हापूर जिल्ह्यात नैसर्गिक गॅस पायाभूत सुविधांचे वितरण व विकास करण्यास एचपी ऑइल गॅस प्रायव्हेट लिमिटेडला अधिकृत केले आहे. “एचपी ऑइल गॅस प्रायव्हेट॑ लिमिटेड ही भारत सरकारच्या उपक्रमांतर्गतील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपोरेशन लिमिटेड आणि ऑईल इंडिया लिमिटेड संयुक्‍त उद्‌यम आहे. कोल्हापुरात नैसर्गिक गॅस पूर्तता करण्यासाठी कंपनी कोल्हापूर जिल्ह्यात नैसर्गिक गॅस पाइपलाइन टाकणार आहे. जिल्ह्याला पाइपदवारे पुरवठा च्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे, पहिल्या टप्प्यामध्ये इचलकरंजी व कोल्हापूरला गॅसवितरण आहे. या प्रकल्पांतर्गत इचलकरंजीमध्ये पाणी  कनेक्शन सिस्टम प्रमाणे सर्वांना घरगुती गॅस मिळणार आहे. पाईपलानदवारे मिळणारा गॅस पारंपारिक सिलिंडरपेक्षा १० ते ४० टक्के स्वस्त असेल. 


यावेळी खा. धैर्यशील माने, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक रवींद्र माने, मोहन मालवणकर व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post