यंत्रमाग धारक अडचणीत.

भरमसाट सुत दर वाढीमुळे यंत्रमाग अडचणीत.

यंत्रमाग धारकाच्यावतीने छत्रपती शिवाजी उद्यान  मध्ये सुत दरवाढ विरोधात निदर्शने करण्यात येणार.


PRESS MEDIA LIVE  : इचलकरंजी : मनु फरास :

 अनैसर्गीक व भरमसाठ सूतदर वाढल्यामुळे यंत्रमागधारक अडचणीत आलेले आहेत. या सुत दरवाढीच्या विरोधात यंत्रमागधारकांच्यावतीने निदर्शने करणेत येणार आहे. तरी सर्व यंत्रमागधारकांनी शनिवार दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता छ.शिवाजी महाराज उद्यानामध्ये या अनैसर्गिक सुतदरवाढी विरोधात निदर्शने करणेत येणार आहे.

गेल्या २ महिन्यांपासून सुतदरामध्ये भरमसाठ वाढ केली जात आहे. परंतू त्या प्रमाणात कापडाला दर येत नसल्याने यंत्रमाग उद्योजकांना नुकसानीमध्ये कापड विकावे लागत आहे. सुत गोडावून फुल्ल भरलेली आहेत. सुत बाचकी ठेवणेस जागा नाही. तरी देखील सुताचासाठा करून सुत व्यापारी सुत दरामध्ये भरमसाठ वाढ करीत आहेत.यंत्रमाग उद्योग हा उत्पादक घटक असल्याने त्यांना उद्योग बंद ठेवता येत नाही. याचा गैरफायदा घेऊन सुत व्यापारी सुताची अनैसर्गीक दरवाढ करींत आहेत. याचबरोबर सुत व्यापारी हे सुताच्या काऊंटमध्ये तफावत, वजनामध्ये तफावत, दिली जाणारी बिले घेतलेल्या सुतापेक्षा वेगळ्या काऊंटची देणे अशा चुकीच्या पद्धतीने व्यापार करींत आहेत.


याला विरोध करणेसाठी पहिले पाऊल शनिवार दि. ५ डिसेंबर २०२० इ.रोजी दुपारी १२.३० वाजता सुत मर्केट येथे निदर्शने करणेत येणार आहेत. यासंदर्भात आज सर्व यंत्रमागधारक संघटना व वस्त्रोद्योगातील नेते मंडळी यांची बैठक दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये पार पडली. या बैठकिमध्ये वाढलेल्या सूत दरासंदर्भात त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या सूत व्यापाऱ्यांसंदर्भात चर्चा होऊन प्रथम निदर्शने करणेत येतील व टप्या-टप्याने सुत व्यापाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणेत येईल असा निर्णय घेणेत आलासदर बैठकिला सतीश कोष्टी, सागर चाळके, प्रकाश मोरे, राजाराम धारवट, राजगोंडा पाटील, पांडूरंग धोंडपूडे, विनय महाजन, विश्वनाथ मेटे, विनोद कांकानी, दत्तात्रय कनोजे, चंद्रकांत पाटील, पांडूरंग सोलगे, प्रकाश गौड, सुरज दुबे, महेश दुधाणे, जनार्दन चौगुले, श्रीशैल कित्तूरे, बंडोपंत लाड व कारखानदार उपस्थित होते

Post a comment

0 Comments