चांगला प्रतिसाद.


 उद्योजकता मार्गदर्शन शिबिरास चांगला प्रतिसाद                                                          

उद्योजकतेकडे करियर म्हणून पहा :सुरेश लोंलो.



PRESS MEDIA LIVE : पुणे :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम सी ई डी) पुणे  यांनी संयुक्तपणे ५ डिसेंबर रोजी साडे अकरा वाजता उद्योजकता विकास मार्गदर्शन  कार्यक्रम गुगल मिट द्वारे  आयोजित करण्यात आला होता.१०० विद्यार्थी सहभागी झाले.एम सी ई डी मुंबई चे वरिष्ठ उद्योग अधिकारी   सुरेश लोंढे तसेच दीपक भिंगारदेव,सुनील शेटे,एस एम कुंभार हे अधिकारी सहभागी झाले. विद्यार्थ्यांना उद्योजकता विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना उद्योगांसाठी मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.  

वरिष्ठ उद्योग अधिकारी सुरेश लोंढे म्हणाले,'आताच्या विद्यार्थ्यांसमोर उद्योजकतेचे अनेक पर्याय आहेत.उद्योजकतेकडे करियर म्हणून पहा.वेगवेगळ्या वाटा  खुल्या आहेत,मात्र लवकर उद्योग सुरु करा.उद्योजकीय मानसिकता तयार करा. उद्योगात आपण घरातील सदस्यांना,मित्रांना सामावून घेऊ शकता.विद्यार्थी दशेपासूनच रोज एक तास उद्योजकतेसाठी दिला पाहिजे. महाराष्ट्र उद्योजकता केंद्र सर्व शासकीय योजना आणि मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील. '      

 दीपक भिंगारदिवे म्हणाले,'छोट्या कामातून उद्योजकतेपासून सुरुवात करा.कमी कर्ज घ्या. प्रथम  अनुभव घ्या.स्वतःच्या उद्योगात नोकरी सारखे राबा.चांगल्या नव संकल्पना घेऊन व्यवसायात उतरा.उद्योगाला लायक होण्यासाठी स्वतःला बदलले पाहिजे.सतत नवनवीन गोष्टी शिकून घेता आल्या पाहिजेत.लोकांना समजून घेणे,प्रभावित करणे आणि त्यांच्याकडून काम करून घेता येणे व्यवसायात महत्वाचे असते.विद्यार्थी दशेपासून उद्योगाच्या,उद्योजकतेच्या संपर्कात राहिले पाहिजे.'  

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ पी ए इनामदार म्हणाले,'नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय उभारण्याची जिद्द ठेवली पाहिजे. विद्यार्थी दशेपासून उद्योजकतेची कास ठेवली पाहिजे. व्यवसाय निवडताना त्यातील सर्व बारकावे माहित असणे गरजेचे आहे. सुनील शेटे म्हणाले,'उद्योजकतेची मानसिक तयारी ठेवा.मनुष्यबळ ,माल ,मार्केटिंग ,भांडवल आणि व्यवस्थापन याची काळजी घेतली पाहिजे. 

 डॉ.व्ही एन जगताप ,प्राचार्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डिप्लोमा म्हणाले,'विद्यार्थ्यांना केंद्रित करून एम सी इ डी ने पुरविलेल्या सर्व सुविधांचा लाभ करून घ्यावा आणि विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरित करावे असे  डॉ. पी.ए. इनामदार ( अध्यक्ष, एम सी ई सोसायटी) यांनी सुचविले असल्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी ५० उद्योजक आझम कॅम्पस मधून उभे राहतील,असा विश्वास आहे'. 

  एस एम कुंभार यांनी मुख्यमंत्री उद्योजकता विकास योजनेची माहिती दिली.कीर्ती सप्रे यांनी सूत्रसंचालन केले . 

----------..

Post a Comment

Previous Post Next Post