भारती विद्यापीठ.


भारती विद्यापीठ ' आयएमईडी ' च्या माजी विद्यार्थी मेळाव्यास चांगला प्रतिसाद.


PRESS MEDIA LIVE : पुणे :

भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( ' आयएमईडी ' )च्या ' सहयोग २०२०  या माजी विद्यार्थी मेळाव्यास शनीवारी  चांगला प्रतिसाद मिळाला.आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले. प्रा. भारती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ऑनलाईन पध्दतीने झालेल्या या मेळाव्यात आशीष सिंग, सुधांशू बेहरा यांनी मार्गदर्शन केले.

सिपला इंडिया लिमिटेड चे ब्रँड मॅनेजर सुधांशू बेहरा म्हणाले, ' मार्केटिंग क्षेत्रात एम.बी.ए. झाल्यावर कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळू शकते. ही नोकरी वारंवार बदलण्याकडे अनेकांचा कल असतो. नोकरी बदलली तरी चालेल पण, निवडलेले क्षेत्र बदलू नका. '

शाओमी टेक्नॉलॉजीचे मार्केटिंग मॅनेजर आशीष सिंग म्हणाले, ' व्यवस्थापनशास्त्र शिकणाऱ्या आणि करीयर करणाऱ्या प्रत्येकाने सोशल मीडिया साईटवर कार्यरत राहिले पाहिजे. व्यक्त होत राहिले पाहिजे.ज्या राज्यात आपण काम करतो, त्या राज्यातील भाषा आपल्याला आली पाहिजे.

आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर म्हणाले, ' व्यवस्थापनशास्त्र, संगणकशास्त्र शिक्षणात आम्ही लॉक डाऊन न करता प्रत्येक दिवशी ऑनलाईन अद्यापन चालू ठेवले.विद्यार्थ्याचे नुकसान होऊ दिले नाही.व्यवस्थापनशास्त्र हे आपल्याला अडचणीतून मार्ग काढून यशस्वी व्हायला शिकवते. 

या संवाद कार्यक्रमात देशा, परदेशातून माजी विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले.

Post a comment

0 Comments