AdSense code राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेतला.

राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेतला.


राज्य साखर कामगारांनी पुकारलेला राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेतला.

पुणे -राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीसह विविध प्रश्नांवर राज्य सरकारने साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती स्थापन करुन चर्चेची तयारी दर्शविलेली आहे. त्यामुळे राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवारपासून (दि.30) जाहीर केलेला राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, महासंघाचे सचिव आनंदराव वायकर यांनी पत्रकार परिषदेत केली.


यावेळी प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, उपाध्यक्ष युवराज रणवरे, डी.बी. मोहिते, अशोक बिराजदार, नितीन बेनकर, सचिव राजेंद्र तावरे, सयाजी कदम, प्रदीप शिंदे, कैलास आवळे, संजय मोरबाळे तसेच महासंघाचे पी. के. मुंडे, सुभाष काकुस्ते, व्ही.एम. पतंगराव व महासंघाचे अन्य . उपस्थित होते.साखर कामगारांच्या प्रश्नांवर माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांनी सकारात्मक भुमिका घेत मधस्थी केल्यामुळे संघर्ष टळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्याच्या सहकार व कामगार विभागाने साखर कामगारांच्या पगार वाढीच्या निर्णयासाठी गेली 19 महिने प्रलंबित असलेली त्रिपक्षीय समिती गठित करण्याच्या निर्णयाचेही आम्ही स्वागत करीत आहोत. या घडामोडीवर प्रतिनिधी मंडळ आणि महासंघाच्या धोरण समितीची बैठक होवून सर्वानुमते संप माघारीचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या…
भाडेतत्वावर व भागीदारीने व विक्री केलेल्या तसेच खाजगी साखर कारखान्यातील कामगारांना कराराप्रमाणे वेतन मिळावे
थकीत पगाराची रक्कम नवीन व्यवस्थापनाने दिली पाहिजे
शेती महामंडळाच्या कामगारांच्या प्रश्नांचीही सोडवणुक व्हावी
साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तीक काम करणाऱ्या कामगारांना अकुशल कामगारांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे
केंद्र सरकारचे कामगार विरोधी कायदे रद्द करावेत.


 

Post a comment

0 Comments