सिरम ची लस सर्वसामान्यांना परवडेल अशी च किमत असणार आहे.

सिरम ची लस सर्वसामान्यांना परवडेल अशीच किंमत असणार आहे.........पूनावला


PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :


पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनावरच्या लशीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे. सीरमचे आदर पुनावाला यांनी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

पूनावाला म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे. त्यांना कोव्हीशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.


त्यांना कोव्हीशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान लसीच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत समाधानी आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत 4 कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे. जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध करणार असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं.

कोरोनावरील लसीवर संशोधन करणाऱ्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना एप्रिल महिन्यात प्राथमिक यश मिळाल्यावर लगेच त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील कोव्हीशील्ड या लसीचे डोस बनवणं सुरु केलं. कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मिती सुरू करुन आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन एक प्रकारे जुगार खेळला होता. ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीच्या चाचण्या यशस्वी होत गेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूटकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. सीरम इन्स्टिट्यूटचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता अदर पुनावाला पाहतात. सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीपैकी नव्वद टक्के लस ही सुरुवातीला भारतीय लोकांना दिली जाईल असं अदर पुनावाला यांनी जाहीर केलंय. ही एक लस सरकारला अडीचशे रुपयांना खरेदी करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Post a comment

0 Comments