मोहम्मद जावेद मौला यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 प्रेस मीडियाचे पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी मोहम्मद जावेद मौला यांना मौलाना आजाद आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :

पुणे : मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या 132 वी जयंती निमित्त मौलाना आजाद कल्चरल हॉल कोरेगाव पार्क येथे सकाळी अकरा वाजता भारतरत्न मौलाना आझाद एज्युकेशन स्पोर्ट्स असोशियन तर्फे शहरातील सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना मौलाना आझाद आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये नगरसेविका परविन हाजी फिरोज शेख, पुणे कँटोन्मेंट बोर्ड चे पूर्व उपाध्यक्ष विनोद मथुरावाला यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार देण्यात आला.  त्याचबरोबर मजहर शेख ,  परमित सिंग गांधी, अझर खान (आरटीआय) यांना मौलाना आझाद समाजसेवक पुरस्कार देण्यात आला.

       त्याचबरोबर मूलनिवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांच्या टीमला मौलाना आझाद सेवभावी पुरस्कार देण्यात आला.  याचबरोबर आदर्श पत्रकार पुरस्कार नदीम रावळ ( सकाळ)  स्वाती शिंदे (टाइम्स ऑफ इंडिया)  नीलेश महाजन (फ्रीलान्स)  मजहर खान संपादक (सजक नागरिक टाइम्स)   ज्येष्ठ पत्रकार प्रेस मीडिया पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी मोहम्मद जावेद मौला यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a comment

0 Comments