केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

 

 

  अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हायला हवे होते मात्र निवडून आलेल्या जो बायडेन यांचे हार्दिक स्वागत - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले 

PRESS MEDIA LIVE :

मुंबई दि. 9 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हायला पाहीजे होते मात्र या अटीतटीच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाले. त्यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे स्वागत. लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पाहिजे असे आवाहन  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे. अमेरिकेची पहिली महिला उपाध्यक्ष म्हणून ऐतिहासिक विजय मिळवलेल्या कमला हॅरिस यांचेही ना. रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे.

 अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिका आणि भारत दोन्ही राष्ट्रांचे सबंध अधिक दृढ होतील.अमेरिकेच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास  ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

अमेरिकेत स्थायिक भारतीयांना न्याय देण्याचे काम अमेरिकेच्या  नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस करतील असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.             

Post a comment

0 Comments