बॉलिवूड : फिरोज नाडियादवाला

फिरोज नाडियाडवाला एनसीबी कार्यालयात दाखल .

PRESS MEDIA LIVE :


मुंबई : ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस दिग्गज मंडळींची नावे समोर यात आहेत. याच नावांमध्ये आता बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. नाडियाडवाला यांच्या पत्नीला एनसीबीने अटक केल्यानंतर त्यांनाही समन्स बजावण्यात आले होते. याप्रकरणी चौकशीकरता फिरोज नाडियाडवाला एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केलेले चार तस्कर आणि बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाची पत्नी शबाना सईद यांना आज वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

8 नोव्हेंबर रोजी एनसीबीने या 5 जणांना अटका केली होती. दरम्यान, निर्माते फिरोज नाडियाडवालाही एनसीबीने समन्स बजावले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ड्रग्ज प्रकरणात रविवारी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. यात ‘वेलकम’ चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घराचाही समावेश होता. एनसीबीला फिरोज यांच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. यानंतर त्यांची पत्नी शबाना सईद यांना अटक करण्यात आली होती.

बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून रविवारी मुंबईतील अंधेरी, खारघरसह पाच परिसरांत छापे टाकण्यात आले. बॉलिवूडशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या घर आणि कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले होते

Post a comment

0 Comments