21 वा वर्षावास संपन्न.


 


भिक्खू विरत्न थेरो यांचा २१ वा वर्षावास संपन्न

PRESS MEDIA LIVE :. मुंबई : 

  मुंबई घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर येथे भारतीय भिक्खू संघाचे "भिक्खू निवास" (बुध्दिष्ट मोनास्ट्री) आहे. भिक्खू संघाचे बौद्ध भिक्खू करीता हे पवित्र स्थान असुन येथे बौद्ध धर्मातील सर्व धर्म संस्कार बौद्ध पुजा विधि, विपश्यना व बाल संस्कार शिबीरे आयोजित केली जातात. 

बौद्ध भिक्षुंच्या जीवनात *वर्षावास* फार महत्त्वाचा धर्म संस्कार असतो, पावसाळ्यातील चार महिने आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा पर्यंत वर्षावास असतो. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे वास्तव्य पाऊसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करुन स्वतःचे चीत्त, मन एकाग्र करून भविष्यकाळाच्या व भुतकाळाच्या इर्ष्या व व्देष या वेदनांमुळे मनात विकार उत्पन्न होणे व विकारातुन उत्पन्न होणारा परिणाम याचा शुध्द व स्थिर मनाने समतेत राहुन विमोड करने व यातून प्राप्त झाले ज्ञान हे सर्व मणुष्यांच्या हितासाठी सुखासाठी प्रचारित करने होय. 

वर्षावात केलेल्या कुशल कर्माच्या कार्याचा सांगता समारोह म्हणजे कठीण चीवरदान होय,

वर्षावास पवारणा समारोह प्रसंगी अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष *भदन्त सदानंद महाथेरो* यांना भिक्खू संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष *विपश्यनाचार्य पुज्य भदन्त संघकिर्तीजी महाथेरो* (प्रमुख :भारतीय भिक्खू संघ) यांनी आपल्या प्रवचनात धर्मप्रेमी लोकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की भिक्खू संघाच्या समुहाला संघ म्हणतात. या संघाचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे अरिय संघ, जो चार उदात्त ज्ञानी लोकांचा असतो. एक भिक्खूंचा संघ असतो जो प्रबोधनासाठी प्रयत्नशील असतो. असे त्यागी भिक्खू जे त्रिरत्नाला (बुध्द, धम्म व संघ) समर्पित झालेल्यांचा भिक्खू संघ. जो नऊ गुणांनी पुर्न असलेला भिक्खूंचा संघ आहे.

धर्मप्रेमी गृहस्थांनी आयुष्यात शांती आणि जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी भिक्खू जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. धर्म, वंश, रंग, राष्ट्रियत्व किंवा लिंग यांची पर्वा न करता लोकांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी बौद्ध भिक्खू समर्पित असतो.

भारतीय भिक्खू संघाची दृष्टि आणि ध्यय धर्मप्रेमी लोकांनी साधावे, *एखाद्यांची स्वतःची क्षमता विकसित करने आणि सेवा-कृतित, कृपा-मानवतावादी सेवा* या व्दारे परिभाषित केले जाऊ शकते.

श्रीमंत, मध्यमवर्गीय, साधारण लोकांपासून तर तळागाळातील गरीब गरजू, कष्टकरी, मजुर, अशिक्षित, निरीक्षर वृध्द आजारी अशा प्रकारच्या सर्व लोकांना भगवान बुद्धांच्या धम्म शिकवणुकीचे शील, समाधी व प्रज्ञा आणि सदाचार मैत्री भावना प्रस्तापित करण्यासाठी बुध्द तत्वज्ञानाची गरज प्रत्येक मणुष्याला आहे असे आपल्याला प्रवचनात *भिक्खू विरत्न थेरो* म्हणाले. 

१९५९ वर्षि बौद्ध भिक्षुंची प्रवज्जा (दिक्षा) घेतलेले *पुज्य भदन्त सदानंद महाथेरो* यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. विजयादशमी १४ आक्टोंबर १९५६ नागपूर येथे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन प्रेरित झालेले पुज्य भदन्त सदानंद महाथेरो यांनी १९५९ वर्षी सारणाथ येथे बौद्ध भिक्खूची दिक्षा घेतली. संपूर्ण महाराष्ट्र, देश विदेशात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. *मिलिंद प्रश्न* नावाचा धम्मग्रंथ मराठी भाषेत लिहून मोठे कार्य केल्याबद्दल त्यांना सध्दम्मादित्य हि पदवी देण्यात आली. भिक्खू संघात सर्वात जेष्ठ असे विव्दान भंते म्हणून ते प्रसिद्ध होते. अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष, संघानुशासक, संघनायक असे प्रमुखस्थानी सध्दम्मादित्य *पुज्य भदन्त सदानंद महाथेरो* होते पुज्य भदन्त यांच्या जाणान्याने भिक्खू संघातील ज्ञानाची पोकळी भरून निघणार नाही असे भिक्खू विरत्न थेरो यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले. 

वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी भारतीय भिक्खू संघा व्दारा करण्यात येत असते. याहीवर्षी कोरोना वायरसच्या प्रादुर्भाव असुन सुद्धा भिक्खू निवासाताच भदन्त काश्यप महाथेरो, भदन्त रत्नबोधी महाथेरो व भिक्खू विरत्न थेरो यांनी पुज्य भदन्त संघकिर्तीजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास केला. कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊनच्यावेळी कोरोना वायरस समाप्त होवो. कोरोना आजारातून संपूर्ण विश्व बाहेर पडो, संपूर्ण जगातील मणुष्य प्राणीमात्रासह सर्व प्राणी सुखी होवोत, शांत होवोत आणि निरोगी राहण्यासाठी भिक्खू संघाव्दारे वेळोवेळी प्रार्थना, परित्राणपाठ, बुध्द वंदना मंगल् मैत्री भावना करण्यात आली. 

यावेळी भारतीय भिक्खू संघाचे प्रमुख *भदन्त संघकिर्ती महाथेरो* (विपश्यनाचार्य) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भिम स्मरण घेण्यात आले. धर्मप्रेमी महिला व पुरुषांना त्रीशरणासह पंचशील देऊन उपस्थित भिक्खू गणांनी परित्राणपाठ पाठ केला. *पुज्य भदन्त संघकिर्ती महाथेरो, भदन्त करूणाज्योती महाथेरो*(खार मुंबई) व *भिक्खू विरत्न थेरो* यांची प्रवचने दिलीत.

कार्यक्रमाला ३८ बौद्ध भिक्षु उपस्थित होते. यावेळी भिक्खू संघास व सर्व उपस्थित लोकांना *मा. हेमंतजी सावंत(कार्यकारी अभियंता)* परिवारा कडुन भोजनदान देण्यात आले. *धम्मसेविका आद. यमुनाबाई रामसिंग दांडगे* यांच्या कडून भिक्खू संघास आर्थिक दान देण्यात आले. *धम्मसेविका आयु. सुनिताताई विशाल म्हैसकर* (असिस्टंट लेबर कमिश्नर) यांच्या तर्फे भिक्खू संघास अष्टपरिष्कार दान देण्यात आले, *धर्मप्रेमी मा. रामटेक साहेब* (आय टी सेवा) यांच्या तर्फे भिक्खू संघास चीवरदान करण्यात आले. *धर्मप्रेमी मा. बाळासाहेब केदारे (सायन)* यांनी बुध्द मुर्तिला फुलांची सजावट केली. *मा. विजय गोरे साहेब* यांनी भिक्खू संघास टावेल दान केले 

कार्यक्रमाला उपस्थितीत स्थानिक कार्यसम्राट नगरसेवक *श्री. परमेश्वर कदम साहेब, इंजी. प्रशांत हेब्रेकर, मा.शेखर गायकवाड* यांनी भिक्खू संघाचा आशिर्वाद घेतला. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुज्य भदन्त काश्यप महाथेरो, भदन्त रत्नबोधी महाथेरो, मा. राहूल थोरात (मुंबई पोलीस) धर्मप्रेमी आयु शशीकलाआई मनोहर जाधव, आयु. सुजाता कांबळे, आयु. सुनिताताई शेजवळ, आयु. केसरबाई तुर्रेराव आयु. नंदा साबळे. कु. स्नेहा, कु. प्राजक्ता, इत्यादी धर्मप्रेमी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आहे.

कार्यक्रमाचे संचालन व्यवस्थापन *भिक्खू विरत्न थेरो* कार्याध्यक्ष भारतीय भिक्खू संघ यांनी केले ह

Post a comment

0 Comments