फटाके मुक्त दिवाळी.

यंदाची दिवाळी फटाके मुक्त.मुंबई - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी होणार असून राज्यात फटाक्‍यांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. याबाबत निर्णय झाल्यास राजस्थान, ओरिसा आणि सिक्कीम पाठोपाठ महाराष्ट्रात दिवाळीत फटाक्‍यांवर बंदी घातली जाऊ शकते.

यासंदर्भात टास्क फोर्स आणि डेथ ऑडीट कमिटीची राजेश टोपे यांनी बैठक घेतली. दिवाळीनंतर थंडीत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. राजेश टोपे म्हणाले, आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करावा.

Post a comment

0 Comments