ठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार.

 ठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार.



मुंबई – राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. अखेर त्यासंदर्भात निर्णय झाला असून, दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दलची माहिती दिली. वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे वचन दिले होते. ते सरकार पूर्ण करत आहे. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. अशा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील परतीच्या पावसाने अनेक भागात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरे करत पाहणी केली होती. पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी मदत करणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर दिला होता.

Post a Comment

Previous Post Next Post