नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी

नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मनपान प्रशासनाने मोफत टोल फ्री क्रमाकांची सुविधा सुरू केलीPRESS MEDIA LIVE :

कोल्हापूर : शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासनाने 1800 233 1913 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरु केली असून ही सुविधा महनगरपालिकेच्या कार्यालयीन दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहील. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

महापालिके संदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी आता घर बसल्याच महानगरपालिकेने जाहीर केलेल्या टोल फ्री क्रमांकावर कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत आपल्या दैंनदिन किरकोळ तक्रारी जशा गटर साफ करणे, औषध फवारणी, तनकट काढणे, कचरा उठाव, किरकोळ स्वरुपाचे अतिक्रमण, पाणी पुरवठा संदर्भातील तक्रारी, डांबावरील बल्ब बसविणे त्याचप्रमाणे स्वच्छता व आरोग्या संदर्भातील तक्रारी दाखल कराव्यात, या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्याचे निराकरण केले जाईल, असेही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केले.

Post a comment

0 Comments