ज्येष्ठ रिपब्लिकन नेते दिवंगत प्रा. रमाकांत यादव यांची उद्या रिपाइंतर्फे जाहीर आदरांजली सभा


ज्येष्ठ रिपब्लिकन नेते दिवंगत प्रा. रमाकांत यादव यांची उद्या रिपाइंतर्फे जाहीर आदरांजली  सभा

PRESS MEDIA LIVE :

मुंबई दि. 23 -बौद्धजन पंचायत समिती चे माजी सभापती ; रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष ; ज्येष्ठ रिपब्लिकन नेते  दिवंगत प्रा.रमाकांत यादव यांची जाहीर आदरांजली सभा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार  दि.24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बोरीवलीतील गोराई बीच जवळ च्या हॉटेल बेव्ह्यू हॉल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर आदरांजली सभेस रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. 

दिवंगत प्रा. रमाकांत यादव यांच्या जाहीर आदरांजली सभेस त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या सभेस प्रमुख वक्ते म्हणून माजी मंत्री अविनाश महातेकर; माजी आमदार सुमंतराव गायकवाड ; आ. विजय भाई गिरकर; काकासाहेब खंबाळकर ; चिंतामण माळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


               

Post a comment

0 Comments