ब्रेकिंग न्यूज : संघर्ष नायक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.



 

संघर्षनायक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

दिनांक 24. रोजी पुरस्कार वितरण.

PRESS MEDIA LIVE : 


कोल्हापूर, दिनांक 22 : जनता संघर्ष दल सामाजिक संघटना व संघर्षनायक मीडिया यांच्या वतीने देण्यात येणारे संघर्षनायक राष्ट्रीय प्राचार्य डॉ . मधूकर बाचूळकर ( पर्यावरण तज्ञ , पँथर दिपक केदार(राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना ) आनंदा शिंगे ( जेष्ठ पत्रकार) बाबासाहेब नदाफ ( राष्ट्रीय संघटक राष्ट्र सेवा दल ) मच्छिंद्र काडापूरे ( जेष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते ) यांना व राज्यस्तरीय पुरस्कार माया प्रकाश रनवरे (असोसियशन ऑफ अफेक्टेड पीपल लेप्रसी) राजेंद्र आनंदराव प्रधान (एकपात्री नाट्य कलाकार ) रवी नौशाद जावळे (संस्थापक-अध्यक्ष अध्यक्ष माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ) राहुल (दादा ) पालांडे राज्य अध्यक्ष लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र यांना संघर्षनायक मीडिया चे संस्थापक संपादक संतोष आठवले यांनी जाहीर केले .पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन वेबिनार मध्ये प्रमुख वक्ते माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे-पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता संघर्ष याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला हे भूषविणार आहेत समारंभ दिनांक शनिवार 24 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सभागृह एम्पायर टॉवर दसरा चौक कोल्हापूर येथे होणार आहे


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ . सुनील गायकवाड प्रमुख कोल्हापूर आकाशवाणी केंद्र, डॉ . अनिल माळी जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर ,डॉ . योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर ,दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गांधीनगर पोलीस ठाणे ,गौसिया खान प्रदेशाध्यक्ष जनता संघर्ष दल हुसेन मुजावर कार्याध्यक्ष दलित महासंघ , वॉल्टर सलढाणा जनरल सेक्रेटरी जनता संघर्ष दल , प्रवीण खताळ ठाणे जिल्हा अध्यक्ष जनता संघर्ष दल अमोल वेट म जनरल सेक्रेटरी रिपब्लिकन स्टूडेंट इंडियन, सौ . लक्ष्मी कोळी जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जनता संघर्ष दल मनोज शिंदे सांगली जिल्हा अध्यक्ष जनता संघर्ष दल , गौतम भगत, आकाश कांबळे ,अमित वेटम ऑल इंडिया पँथर सेना , सांगली आदींना निमंत्रित करण्यात आले आहे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संघर्ष नायक मीडियाचे व्यवस्थापक समीर विजापूरे व परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल करणे हे आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्याचे ऑनलाईन प्रसारण Sangharshnayak Twentyfour  फेसबूक पेज व Sangharshnayak24   या यूट्यूब चैनल वरून प्रसारित होणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post