लेटेस्ट : पंच नाम्याची नाटके आता बंद करा

 ओला दुष्काळ जाहीर करा!

पंचनाम्याची नाटके बंद करा! 

हेक्टरी 50 हजाराची मदत करा!

अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार!

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ.विकास पाटील यांचा इशारा!



 PRESS MEDIA LIVE : शिरोळ : प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील शेतकरी पूर्वी कोरोना  प्रादुर्भावामुळे व वर्तमानात या अस्मानी संकटामुळे अर्थात  अतिवृष्टीमुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. राज्यकर्ते या संकटावर मात करत तात्काळ शेतकऱ्यांना सहकार्य करण्यापेक्षा उध्वस्त शेती व शेतकऱ्यांना भेटण्यासाठीचे नाटक करत महाराष्ट्रभर फिरत आहेत. ही दिखावे नाटके बंद झाली पाहिजेत.ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ.विकास पाटील यांनी केली.

डॉ.विकास पाटील हे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे यांना दिलेल्या निवेदनानंतर बोलत होते.

यावेळी बोलताना डॉ.विकास पाटील म्हणाले की,  लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार करण्याच्या वल्गना करणारे हे सरकार शेती व शेतकऱ्यांप्रती संवेदनाहीन होऊन  दुटप्पी भाषा कशासाठी वापरतात हा खरा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून त्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा केवळ नाटकीपनात राज्यकर्ते मशगुल असल्याचेही डॉ.विकास पाटील यांनी सांगितले.

डॉ.विकास पाटील पुढे म्हणाले,केंद्र व राज्य सरकार या संवेदनाशिल अडचणीत राजकीय कपटकारण करत असेल तर आजचा हा तरुण शेतकरी अश्या कपटकारन्यांना बांधावरच गाढल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्रातील बहुसंख्य आमदार , खासदार व मंत्री हे शेतकरी पुत्रच आहेत परंतु संवेदनाशून्य आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना भेटीचे नाटक करण्यापेक्षा शासकीय मदत व पिक विमा निधी कसा तात्काळ उपलब्ध करून देता येईल ते बघितले पाहिजे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी पाहणी करून तात्काळ अहवाल देण्यासाठी  प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आहेत. शासनाचा शेवटचा बोल्ट म्हणजे गावचा तलाठी आहे. त्यांच्या नजर अंदाजाने 48 तासात 100% उद्ध्वस्त उध्वस्त जमिनीचा अहवाल शासनाकडे दिला पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही. केवळ पंचनाम्याचे नाटक करून  चालढकल करण्याचे काम हे सरकार करतेय. केंद्र सरकारच्या 2018 च्या तरतुदीनुसार शेतीचे एकंदरीत 35 % नुकसान झाले तरी ते नुकसान ग्राह्य धरून तात्काळ मदत द्यावी असा निर्णय आहे. आज रोजी तर 100 % नुकसान झाले, शेतातील पिक कुजून गेली आहेत.  सर्वकाही भुईसपाट झालेले आहे. तरी ही पंचनाम्याची नाटके कशासाठी? शेतकऱ्यांना विना पंचनामा तात्काळ 50,000/- रुपये  मदत शासनाने करत पिक विमा संरक्षणाचा निधी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला पाहिजे. केवळ नाटक करून, दिखावे करून  शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका. महाराष्ट्र हे कधीच सहन करणार नाही. शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ सहकाऱ्याची पावले उचलली नाहीत तर संभाजी ब्रिगेड राज्यभर तीव्र आंदोलन करणार, राज्यकर्त्यांना अडवणार व जाब विचारणार असा इशाराही डॉ.विकास पाटील यांनी दिला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शिरोळ शहराध्यक्ष आकाश खोत, तालुकाध्यक्ष हर्षद पाटील, सोशल मीडिया प्रमुख इंजि.विद्यानंद पाटील,अनुप पाटील,संजय पाटील ,सुहास पाटील इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post