शेतकऱ्यांची फसवणूक.

 भात कापणी यंत्र बाबत शेतकऱ्यांची फसवणूक,

किसान विकास शेतकरी संघाने जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले.

PRESS MEDIA E : सिंधुदुर्गनगरी  प्रसाद पाताडे :

                                                   

भात कापणी यंत्र बाबत संबंधित कंपनीकडून आपली फसवणूक झाली असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा किसान विकास शेतकरी संघाचे अध्यक्ष अमित फाटक यांनी केला आहे. ही मशीन वारंवार बिघडत असल्याने ती आपल्याला बदलून मिळावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. योग्य तो न्याय न मिळाल्यास उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष भद्रसेन लोके व संदीप चव्हाण उपस्थित होते.

कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार २०१८ साली एका कंपनीकडून भात कापणी यंत्र एक लाख ३६ हजार रुपयांना खरेदी केले आहे. या यंत्राने काम करताना ते वारंवार नादुरुस्त होत आहे त्यामुळे मागील दोन वर्षात यंत्राचा आपल्याला कोणताच उपयोग झालेला नाही याकडेही त्यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. याबाबत संबंधित कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीकडून बेजबाबदार व उद्धटपणाची उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post