केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आव्हान.


कोरोना साथरोग पसरू नये यासाठी यंदा दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर गर्दी करू नका - 

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे  आवाहन

 PRESS MEDIA LIVE :  मुंबई :

  मुंबई दि.7 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दरवर्षी  चैत्यभूमीवर  लाखो आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी होत असते. यावर्षी कोविड 19 या विषाणू च्या कोरोना साथरोगाचे जीवघेणे संकट संपूर्ण जगावर ओढवलेले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचा धोका महाराष्ट्रात वाढलेला आहे. त्यामुळे  कोरोना रोगाचा प्रसार वाढण्याचा धोका लक्षात घेऊन  यंदाच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी दि. 6 डिसेंबररोजी  चैत्यभूमी येथे  आंबेडकरी जनतेने गर्दी करू नये तसेच नागपूर ला दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनी 25 ऑक्टोबरलाही कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी आंबेडकरी जनतेने गर्दी करू नये असे आवाहन रिपब्लिकन  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे. यंदाच्या  महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीचे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीचे ऑनलाइन दर्शन व्हावे याबाबतची सूचना प्रशासनाला केली आहे.  आज मुंबईत  मलबार हिल येथील  सहयाद्री  अतिथी गृहात  केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पोलीस;  प्रशासन ; सामाजिक न्याय मंत्रालय ; बेस्ट ;रेल्वे आदी सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रिपब्लिक  पक्षाचे गौतम सोनवणे; दयाळ बहादूर; सिद्धार्थ कासारे ; प्रकाश जाधव ऍड अभया सोनवणे महापरिनिर्वाण समन्वय समिती चे नागसेन कांबळे;रवी गरुड; ऍड. बी के बर्वे; शिरीष चिखलकर ;चंद्रशेखर कांबळे;  आदी  अनेक मान्यवर उपस्थित होते. 

कोरोना हा अत्यंत घातक रोग आहे. त्याचा प्रसार होऊ नये यासाठी मार्च पासून सुरू झालेल्या लॉकडाऊन मध्ये 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरीच गर्दी न करता साजरी झाली;गणेशोत्सव गर्दी न करता साजरा झाला; ईद ही गर्दी न कारता साजरी झाली त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सवही गर्दी न करता साजरा केला जाईल. कोरोना रोग प्रसाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून येत्या 6 डिसेंबर ला चैत्यभूमी येथे गर्दी न करता अभिवादन करण्याबाबत नियमावली ठरविण्यासाठी महापरिनिर्वाण समन्वय समिती ने केलेल्या सूचनेनुसार ना रामदास आठवले यांनी आज सर्व संबंधितांची बैठक घेतली. त्यात ऑनलाइन दर्शन या  पर्यायबाबत सूचना ना रामदास आठवलेंनी प्रशासनाला केली. त्यामुळे यंदा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनीचैत्यभूमी येथे  आणि 25 ऑक्टोबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिनी दिक्षाभूमी येथे  गर्दी न करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे. 

चैत्यभूमी हे जगभरातील आंबेडकरी अनुयायांसाठी पवित्र श्रद्धास्थान आहे.या चैत्यभूमी चा स्तूप जीर्ण झाला असून त्याचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. जर जीर्ण झालेला आणि मोडकळीस आलेला चैत्यभूमी चा स्तूप अतिवृष्टीने पडला तर मोठा अनर्थ घडेल त्यामुळे त्वरीत चैत्यभूमी चा स्तूप दीक्षाभूमी च्या स्तुपाप्रमाणे भव्य बनवावा त्यासाठी मनपा कडे असलेला 6कोटींपर्यंत चा निधी उपयोगात आणण्याची सुचना ना रामदास आठवले यांनी केली. 

इंदुमिलस्थळी उभारण्यात येणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर    यांचे स्मारक काम येत्या 36 महिन्यांत पूर्ण होईल अशी माहिती शापुरजी पालनजी कंपनी च्या अधिकऱ्यांनी दिली.या स्मारकात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्वी 350 फुटांचा पुतळा उभारण्यात येणार होता त्यात मी सूचना केल्या मुळे 450 फुटांचा उंच पुतळा उभारण्यात येणार आहे अशी माहिती ना रामदास आठवले यांनी दिली. महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास  महामंडळात 200 हुन अधिक कर्मचाऱ्यांच्या 

 जागा रिक्त असून त्या त्वरित भराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवीत असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले. लॉकडाऊनकाळात रेल्वे प्रवासासाठी राज्य सरकारने प्रेसकार्डधारक सर्व पत्रकारांना  अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वे प्रवसाची परवानगी द्यावी त्याबाबत चे पत्र राज्य सरकार ने रेल्वे ला द्यावे अशी सूचना आपण मुख्यमंत्री आणि मुख्यसचिवांना करणार असून रेल्वेमंत्र्यांना ही पत्र पाठविणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

भाजप चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे  आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जातील अशी चर्चा असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ना रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी राज्यात भाजप मजबूत केला आता त्यांनी राष्ट्रवादी मध्ये जाऊन उपयोग  नाही आता या मंत्रिमंडळात जागा शिल्लक  नाही त्यापेक्षा त्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे आपण मिळुन महाविकास आघाडी सरकार ला सत्तेतून बाहेर खेचू आणि आपले सरकार आणूया असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले.             

       

Post a comment

0 Comments