भारताचे धर्मनिरपेक्षतत्व बुडवणारी घटना.

 मुस्लिम समाजाच्या महिलेचा हिंदू पद्धतीने होणारा अंत्यसंस्कार ही भारताचे धर्मनिरपेक्षत्व बुडवणारी घटना .   श्यामभाऊ गायकवाड


PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे ताडीवाला रोड येथील मुस्लिम महिलेचा हिंदू धर्माप्रमाणे दादागिरीच्या जोरावर अंत्यसंस्कार पोलीसांकडून करणे अत्यंत धक्कादायक असून यामुळे भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष धोरणाची तसेच धार्मिक स्वातंत्र्य विषयक बाबींचे पूर्णता उल्लंघन असून याविषयी सोमवारी भीमछावा संघटना व सहयोगी मुस्लीम व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे भीमछावा संघटनेचे संस्थापक श्यामभाऊ गायकवाड यांनी सांगितले आहे.

ताडीवाला रोड येथील रशिदा इस्माईल शेख या महिलेचे 70 व्या वर्षी अल्पशा आजारामुळे निधन झाले होते. सदर महिला मुस्लिम असून तिचा अंत्यविधी मुस्लिम धर्म रीतिरिवाजाप्रमाणे व्हावा अशी अपेक्षा स्थानिक मुस्लीम लोकांनी व प्रश्न एवजी च्या लोकांनी केलेली असताना देखील बंडगार्डन पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले व बेकायदेशीरपणे सदर मुस्लिम महिलेचा हिंदू धर्म रीतीरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार केला आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत असून या संदर्भामध्ये उद्या आठ तारखेला माननीय पोलीस आयुक्त पुणे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहोत तसेच याप्रश्‍नी पोलिस आयुक्तांकडून कारवाई न झाल्यास सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पुणे पोलीस आयुक्तालय समोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.

*व तसेच 8 ऑक्टोबर 20 20 रोजी दुपारी तीन वाजता माननीय अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्त यांना एक शिष्टमंडळ भेटून निवेदन देणार आहे.

Post a comment

0 Comments