पुणे मनपा उत्पन्न घेणार


 मालकी जागेवर जाहिरात होर्डिंग लावून पुणे महापालिका  उत्पन्न घेणार.

PRESS MEDIA LIVE :  पुणे : मोहम्मद जावेद मौला :

पुणे – महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पालिकेच्या मिळकतींवर जाहिरातींचे होर्डिंग उभारून त्याद्वारे उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरातील महापालिकेच्या मिळकती आणि जाहिरातींसाठी योग्य जागांचा सर्व्हे आणि अभ्यास करण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी महापालिकेच्या प्रशासकीय इमारती, नाट्यगृह, क्रीडा संकुले, बहुद्देशीय भवन, सांस्कृतिक केंद्र, शाळांच्या इमारती अशा अनेक वास्तू आहेत. तसेच उद्याने, क्रीडांगणे आणि मोक्‍याच्या रस्त्यांवरील जागा ताब्यात आहेत.

याठिकाणी महापालिकेच्या वतीने जाहिरातींचे होर्डिंग उभारून उत्पन्न मिळू शकणार आहे. महापालिकेच्या मिळकतींची संख्या मोठी असली तरी नेमक्‍या मोक्‍याच्या जागा कोणत्या, कोठे जास्त चांगला प्रतिसाद मिळू शकेल, यासाठी सर्वेक्षण आणि अभ्यास होणे गरजेचे आहे.

महापालिकेकडील कर्मचारी संख्या आणि सद्यस्थिती पाहता त्यांच्याकडून हे सर्वेक्षण होणे वेळखाऊ आहे. तसेच, व्यावसायिकदृष्ट्या मूल्यमापनही किचकट आहे. यामुळे पालिकेने सर्वेक्षण आणि अभ्यासासाठी व्यावसायिक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. 25 ऑक्‍टोबरपर्यंत पर्याय मागविण्यात आले आहेत. यासंदर्भातील प्रिबीड मिटिंग दि. 8 ऑक्‍टोबरला होणार आहे. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपायुक्त संजय गावडे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post