आरपीआयचे मंगल राव माळगे यांची नियुक्ती करावी.

 भाजपा स्विकृत नगरसेवकपदी आर.पी.आय.चे मंगलराव माळगे यांची नियुक्ती करावी.

किरण हुपरीकर  : कार्यकारी संपादक हुपरी समाचार

PRESS MEDIA LIVE : हुपरी :

हुपरी नगरपरिषदेमध्ये भाजपा सत्तेवर आल्यापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्विकृत नगरसेवकपदी नियुक्ती केली गेली. केंद्रामध्ये भाजपा सरकारची सत्ता आहे. भाजपासोबत आर.पी.आय.(ए) सातत्याने सक्रिय सहभागी आहे. हुपरीतील मा. मंगलराव माळगे हे आर.पी.आय.(ए) पक्षाच्या राज्य सचिव पदाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभागी आहेत. हुपरी ग्रामपंचायतीचे मानाचे सरपंचपदही त्यांनी भुषविले आहे. 

हुपरी नगरपरिषद स्थापण्यात मंगलराव माळगे यांचे योगदानही मोठे आहे. नगरपरिषदेत भाजपाची सत्ता स्थापण झालेपासून त्यांचे सहकार्य बहुमोलाचे असेच आहे.

अशा व्यक्तीमत्वास स्विकृत नगरसेवकपद देऊन त्यांचा सन्मान करणे उचित ठरेल. तरी मा. मंगलराव माळगे यांची हुपरी नगरपरिषद भाजपा स्विकृत नगरसेवकपदी नियुक्ती करावी अशी समस्त हुपरीकर जनता, आर. पी. आय.(ए), मंगलराव माळगे समर्थक यांची मागणी आहे असे प्रतिपादन हुपरी समाचारचे कार्यकारी संपादक किरण हुपरीकर यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments