मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी.


मुस्लिम महिलेची अंतिम संस्कार हिंदू पद्धतीने केले. मुख्यमंत्र्यांकडे कारवाई  करण्याची मागणी.

PRESS MEDIA LIVE :. पुणे :

पुणे : येथील ताडीवाला रोड परिसरातील मुस्लिम समाजातील रहिवासी महिला हिचे अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता.सदर महिला मुस्लिम असतानाही तिचा अंत्यविधी पोलिसांनी दादागिरीच्या बळावर हिंदू धर्म रीतिरिवाज प्रमाणे केला=असल्याची तक्रार मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

रशिदा इस्माईल शेख वर्ष 70 राहणार ताडीवाला रोड यांची दिनांक 22 सप्टें 2020 रोजी ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता. सदर महिलेला जवळचे कोणीही नातेवाईक नसल्याने स्थानिक मुस्लिम समाजाच्या लोकांनी सदर मयत ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्याबाबतची विनंती बंडगार्डन पोलीस ठाणे यांच्याकडे केली होती. परंतु सदर विनंती नाकारत पोलिसांनी सदर मुस्लिम महिलेचा अंत्यविधी हिंदूधर्म रीतीरिवाजाप्रमाणे स्मशानभूमी येथे केला. ही बाब अत्यंत धक्कादायक भावना दुखावणारी आहे.

       सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने नुकतेच अंत्यविधी करताना सन्मानपूर्वक व त्या व्यक्तीच्या धर्मानुसार करण्याबाबतचे आदेश जारी केले होते. रशीदा इस्माईल शेख या इस्लाम धर्माला अतिशय मानणाऱ्या होत्या मृत्यूनंतर संपुर्ण अंत्यविधी हा इस्लामिक रीतिरिवाजाप्रमाणे व्हावा यासाठी अन्य कोणीही खर्च करू नये म्हणून त्यांनी स्वतः सुमारे दोन काही दिवसापूर्वी पाच हजार रुपये रक्कम स्थानिक मुस्लीम मंडळाकडे जमा देखील केली होती. तसेच त्यांचे राहते घर हे देखील मृत्यूनंतर मशिद साठी दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.  त्यानुसार स्थानिक मुस्लीम कार्यकर्त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रशीदा शेख यांचा अंत्यविधी मुस्लिम धर्म रीतिरिवाजाप्रमाणे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु पोलिसांनी कोणालाही न जुमानता रशिता यांची अंतिम इच्छा नाकारत त्यांचा अंत्यविधी हा गैरमुस्लिम पद्धतीने किंबहुना हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे अग्नीदहा करून केलेला आहे. सदर बाब मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावणारे असल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी सदर निवेदनात अंजुम इनामदार यांनी केली आहे.

         दरम्यान सदर प्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील पोलीस आयुक्त यांना सादर केलेल्या निवेदनात इनामदार यांनी केलेली आहे. सदर प्रकरणी कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील दोन दिवसात आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

      छायाचित्रात.

*अंजुम इनामदार*

अध्यक्ष मूलनिवासी मुस्लीम मंच,

*राहुल डोंबाळे*

अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा,

*सौ.अनिता साबळे*

भीमा-कोरेगाव संघर्ष समिती,

*बाबासाहेब कांबळे*

कष्टकरी कामगार पंचायत,

*बाळासाहेब भागवत*

Rpi पीसीएमसी सचिव,

*कुणाल ओव्हाळ*

युवा नेता,

*ख्वाजा शेख*,

*शेख लाल नदाफ.*

दिसत आहे.


आपला.अंजुम इनामदार

9028402814

Post a Comment

Previous Post Next Post