१८ टक्क्यांनी घट.


टाळे बंदीमुळे चालूवर्षात मुद्रांक शुल्क विभागाला पुण्यातून मिळणाऱ्या महसुलात १८ टक्क्यांनी घट

PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे : टाळेबंदीमुळे चालू वर्षांत मुद्रांक शुल्क विभागाला पुण्यातून मिळणाऱ्या महसुलात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दस्त नोंदणीत वाढ झाल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात सर्व शासकीय व्यवहार ठप्प होते. तसेच याच काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा परिणाम दस्त नोंदणीवर देखील झाला असून परिणामी महसुलात घट झाल्याचे निरीक्षण करोना येण्याआधी जानेवारी आणि फे ब्रुवारी महिन्यात नेहमीप्रमाणे दस्त नोंदणी होत महसूल प्राप्त झाला आहे, तर मार्च महिन्यात पहिले १५ दिवस दस्त नोंदणीची कार्यालये सुरू होती. त्यामुळे जानेवारी, फे ब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात कमी दस्त नोंद झाले. त्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांत सर्वाधिक फटका बसला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.


दरम्यान, सध्या पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत दररोज उपचारांनंतर बरे होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून जास्त आहे. याशिवाय टाळेबंदीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आल्याने राज्य सरकारने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या काळात तीन टक्के , तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या काळात दोन टक्क्यांनी मुद्रांक शुल्कात कपात के ली आहे.त्यामुळे ऑक्टोबर अखेरीस दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी या सणांच्या दिवसांत सदनिका खरेदी-विक्री वाढण्याची शक्यता आहे.

सप्टेंबपर्यंत पुण्यातील दस्त नोंदणी आणि प्राप्त महसूल महिना, कं सात नोंदलेले दस्त आणि महसूल जानेवारी (४२ हजार ७६७) ३९१ कोटी, फे ब्रुवारी (४० हजार ७३८) ३५८ कोटी, मार्च (२८ हजार २५३) २२५ कोटी, एप्रिल (तीन) ७८० रुपये, मे (२४७३) ३० कोटी, जून (१८ हजार २०२) १७० कोटी, जुलै (२० हजार ७९०) १५६ कोटी, ऑगस्ट (२७ हजार २७६) २०२ कोटी आणि सप्टेंबर (३४ हजार ७१४) १८९ कोटी. चालू वर्षांत सप्टेंबरअखेपर्यंत एकू ण दोन लाख १५ हजार २१६ दस्त नोंद होऊन पुण्यातून १७२४ कोटी रुपयांचा महसूल विभागाला मिळाला..

Post a Comment

Previous Post Next Post