AdSense code करोना किलर मशीन.

करोना किलर मशीन.

 

पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल कंपनी तर्फे“करोना किलर मशीन’ विकसित

Digital Press media  : पुणे : मोहम्मद जावेद मौला :


 
करोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी आपण हॅन्ड सॅनिटायझर, साबण, विविध स्वच्छता रसायनांचा वापर करतो, पण याद्वारे आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वच वस्तू स्वच्छ होतात का? याचं उत्तर बहुतांशी “नाही’ हेच असेल.  आपल्या आसपासची हवा आणि विविध वस्तू यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी “करोना किलर’ हा उपयुक्‍त पर्याय आपल्याला उपलब्ध झाला आहे.

पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रिअल सोल्युशन लिमिटेड या कंपनीतर्फे “करोना किलर’ हे उपकरण विकसित करण्यात आले असून, त्याला आयसीएमआर या संस्थेने प्रमाणित केले आहे. सध्या पुण्यातील नायडूसह अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी या उपकरणाचा वापर होत आहे. रुग्णालय, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालय, हॉटेल-रेस्टॉरंट, व्यायामशाळा छोटे क्‍लिनिक, शासकीय- खासगी कार्यालये अशा ठिकाणी लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. याठिकाणी “करोना किलर’ हे मशीन उपयोगी ठरणार आहे. 

याबाबत इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब बापूसाहेब जंजिरे म्हणाले, “पुणे शहरातील शिवणे या भागामध्ये या उपकरणाचे उत्पादन केले जात आहे. आतापर्यंत या उपकरणास महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतून मोठी मागणी आहे.’

हे विद्युत उपकरण असून सिंगल फेज सप्लायवरदेखील चालते. त्याला कुठलेही साबण आणि सॅनिटायझर किंवा पाणी इत्यादीची गरज लागत नाही. हे उपकरण पोर्टेबलपासून ते मोठ्या कंपन्यांमध्ये वापरता येतील, अशा पद्धतीने बनविण्यात आले आहे. अतिशय मुबलक किमतीत ते उपलब्ध असून घरपोच डिलिव्हरीदेखील कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 8600022260/8600022262/8600022263 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


असे काम करते “करोना किलर’

हे उपकरण ज्या ठिकाणी लावले जाते तेथे हवा आत घेते व त्या हवेचे रुपांतर आयन्समध्ये करते तेच आयन्स परत वातावरणात सोडले जातात. या आयन्सद्वारे वातावरणामधील तसेच एखाद्या वस्तूच्या पृष्ठ भागावरील विषाणू आणि जीवाणू नष्ट केले जातात.

Post a comment

0 Comments