केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



बलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी नराधमांना फाशीची कठोर शिक्षा करा  - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

PRESS MEDIA LIVE : मुंबई :

*आरे कॉलनीतील साडेचार वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीच्या परिवाराची भेट घेऊन केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंनी  रिपाइं तर्फे 50 हजार रुपयांची मदत केली जाहीर* 

मुंबई दि.8 - आरे कॉलनीत मजुरी करणाऱ्या दाम्पत्यांच्या अवघ्या साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा अमानुष प्रकार करणाऱ्या पशुहून हीन वृत्तीच्या गुन्हेगाराला कठोरात कठोर फाशीची शिक्षा करा ; बलात्काराचे असे घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करुन कायद्याची जरब बसवावी असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली. 

आरे कॉलनी येथील युनिट नंबर 32 येथील  साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची अमानुष घटना घडल्याचे कळताच ना.रामदास आठवले यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची त्यांच्या आरे कॉलनीतील निवास्थानी जाऊन भेट घेतली. अत्याचार पीडित मुलगी रुग्णालयात दाखल असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्या परिवाराला रिपब्लिकन पक्षातर्फ़े 50 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले. यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव;  विजय कांबळे;धनराज; ऍड अभयाताई  सोनवणे ; उषाताई रामळु आदी अनेक रिपाइं पदाधिकारी उपस्थित होते. 


                   

                   

Post a Comment

Previous Post Next Post